नवी दिल्ली : काही काळासाठी धुमसणारी ठिणगी अखेर वणव्याचं रुप घेऊन सर्वकाही बेचिराख करु लागली, हेच चित्र सथ्या रशिया- युक्रेन युद्धात पाहायला मिळत आहे. रशियन सैन्यानं एक-एक करत युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केले, महत्त्वाच्या इमारची जमीनदोस्त केल्या आणि या राष्ट्राला हतबलतेच्या वळणावर आणलं. (Russia ukraine war)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियन सैन्याकडून युक्रेनवर होणारा मारा काही केल्या थांबत नसतानाच ज्याची भीती होती, तेच घडतना दिसत आहे. 



युद्ध जरी सातासमुद्रापार सुरु असलं तरीही त्याचे परिणाम आता थेट तुमच्या खिशावर होताना दिसणार आहेत. कारण, 2008 नंतर कच्च्या तेलाचे दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. 


कच्च्या तेलाचे दर सध्या प्रती बॅरल 129 डॉलरवर पोहोचले आहेत. आज उत्तर प्रदेशात मतदानाचा अखेरचा टप्पा आहे. 


संध्याकाळी 5.30 वाजल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता आहे. दर नेमके किती वाढवायचे याचा निर्णय एक्झिट पोलवरून ठरणार आहे. 


परिणामी येणारे दिवस सर्वसामान्यांसाठी प्रचंड महागाईचे असणार आहेत, हेच स्पष्ट संकेत मिळत आहेत. 


रशिया कच्च्या तेलाचा मोठा उत्पादक देश रशिया आणि युक्रेन युद्ध न थांबल्यास भारतातही आर्थिक संकट ओढावण्याची चिन्हं आहेत. रशियाकडून युरोप, भारत इत्यादिंना मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. 


जगातील 10 बॅरल तेलामध्ये रशियाचा मोठा वाटा आहे. अशातच तेलाचा पुरवठा खंडित झाल्यामुळं त्याच्या दरांत लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या रशियाच्या 66 टक्के कच्या तेलाचा खप होणं प्रतिक्षेत आहे. 


तेव्हा येणारे दिवस तुम्ही आम्हीही या युद्धानं प्रभावित होणार हे नाकारता येत नाही.