Russia-Ukraine War : रशियाविरुद्ध Apple पासून Google पर्यंत या कंपन्यांनी उचलले मोठे पाऊल
जगातील अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी रशियाच्या विरोधात पावले उचलली आहेत. यामध्ये Google, Apple, Microsoft आणि SpaceX पासून Twitter, Netflix आणि Meta या कंपन्यांचा समावेश आहे.
Russia-Ukraine War : यूक्रेनवर रशियाकडून हल्ल्यानंतर जगभरात चिंतेचं वातावरण आहे. रशियावर अनेक देश यामुळे नाराज आहेत. अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये अनेक कंपन्यांचा देखील समावेश आहे. जगातील अनेक मोठ्या कंपन्या जसे की Google, Apple, Microsoft आणि SpaceX पासून ते Twitter, Netflix आणि Meta यांनी देखील रशियावर निर्बंध लादले आहेत.
Russia-Ukraine War: रशिया विरुद्ध कोणत्या कंपनीने काय पाऊलं उचलली
SpaceX : स्पेस-एक्स चीफ Elon Musk यांनी त्यांची Starlink Satellite Internet सेवा यूक्रेनमध्ये पोहोचवली आहे. याच्या मदतीने यूक्रेनच्या कम्यूनिकेशन नेटवर्कवर हल्ल्यानंतर ही इंटरनेट सेवा सुरु आहे.
Apple : अॅप्पलने घोषणा केलीये की, रशियामध्ये ते त्यांचे कोणतेही प्रोडक्ट विकणार नाहीत. कंपनी रशियात त्यांचे App स्टोर आणि अॅप्पल मॅप्स वर ट्रॅफिक आणि लाईव्ह इन्सिडेंट अपडेट देखील बंद केले आहे. अॅप्पलने रशियन अॅप RT आणि Sputnik यांना देखील काढून टाकले आहे.
Google : गूगलने सांगितले की, त्यांनी आपल्या मॅप्स अॅपवर यूक्रेनमधील लोकांच्या सुरक्षेसाठी लाईव्ह ट्रॅफिक डेटा आणि बिजी-नेस लेयर देखील बंद केले आहे. गूगल यूक्रेनच्या वेबसाईट्सला रशियाच्या DDoS हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मदत करत आहे.
Microsoft : मायक्रोसॉफ्टने विंडोज अॅप स्टोर वरुन RT अॅप हटवले आहे. Bing वर RT आणि Sputnik ची रँकिंग देखील हटवली आहे. कंपनीने ही देखील घोषणा केलीये की, ते यूक्रेनच्या विरोधात होणाऱ्या सायबर हल्ल्यांना ओळखून यूक्रेन सरकारला याबाबत याआधीच माहिती देईल.
YouTube : गूगलचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने रशियाच्या स्टेट मीडिया चॅनेलसाठी जाहिराती बंद केल्या आहेत. सोबतच फीडमध्ये या सर्व चॅनेल्सना रिकमेंड करणं देखील बंद केले आहे. RT आणि Sputnik चॅनेलला देखील ब्लॉक केले आहेत.
Meta/ Facebook: फेसबूकने रशियाच्या स्टेट मीडियासाठी जाहिराती बंद केल्या आहेत. सोबत मॉनेटायजेशन देखील थांबवले आहे.
Twitter: ट्विटरने यूक्रेन आणि रशियामध्ये जाहिराती दाखवणं बंद केलंय. ज्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातील दिलेली माहिती लोकांना आधी दिसेल. ट्विटवर देखील बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. चुकीची माहिती रोखली जात आहे.
Netflix: नेटफ्लिक्सने रशियाच्या 20 चॅनेल्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन हटवले आहे. कंपनीने सगळे रशियने कार्यक्रम आणि प्रोजेक्टस देखील बंद केले आहेत.