मास्को : Russia Ukraine Conflict : रशियन सैन्य आता समुद्री हल्ल्यासाठीही तयार झाल्याचे दिसत आहे. ब्लॅक सीमध्ये रशियन जहाजे दिसू लागली आहेत. त्यामुळे युक्रेनवरील हल्ल्यासाठी रशियाने मोठी तयारी केल्याचे दिसत आहे. यूक्रेनमधील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाने कब्जा केल्याचे समजते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, स्वीडनच्या हवाई हद्दीत रशियाची लढाऊ विमाने, घुसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसा स्वीडनने मोठा आरोप रशियावर केला आहे. चार रशियन जेट हद्दीत आल्याचा दावा स्वीडनने केलाआहे. बाल्टिक समुद्रामधून विमानांनी हद्द ओलांडली, असल्याचे स्वीडनने म्हटले आहे.


अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाचा कब्जा


यूक्रेनमधल्या सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाने कब्जा केल्याचे समजते आहे. त्यामुळे अख्ख्या जगाचं टेन्शन वाढले आहे. युक्रेनमधला अणू ऊर्जा प्रकल्प ताब्यात घेतल्याचा दावा रशियाने केला आहे. युक्रेनमधल्या जोपोरिज्ज्यामध्ये अणू ऊर्जा प्रकल्प आहे. मात्र हा भाग अजूनही आपल्याच ताब्यात असल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान युक्रेनमधल्या अणू ऊर्जा प्रकल्प परिसरातली घुसखोरी रशियाने ताबडतोब थांबवावी, अशी सूचना इंटरनॅशनल अॅटोमिक एनर्जी असोसिएशननं केली आहे. 


रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला



तर दुसरीकडे युरोपमधील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पावर कब्जा केल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला आहे. हे खरं असेल तर मागे हटा, अणूऊर्जा संघटनेचा रशियाला आदेश देण्यात आला आहे.