मास्को : Russia Ukraine War : सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. रशियाने आक्रमकपणा घेत युक्रेनवर जोरदार हल्ले चढविले आहेत. युक्रेनवरील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रशियावर निर्बंध घातले आहे. यानंतर रशियाकडून अमेरिकेला इशारा देण्यात आला आहे. निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र कोसळेल, असा गर्भित इशारा रशियन अंतराळ संशोधन संस्था, रॉसकॉसमॉसने दिला आहे. (Russia-Ukraine war: Russia warns US after sanctions)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युक्रेनवर हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपने रशियन सरकार आणि कंपन्यांवर कडक आर्थिक निर्बंध लादले आहेत. मात्र यामुळे अवकाश केंद्रांच्या देखभालीच्या कार्यक्रमावर परिणाम होणार असून ते पृथ्वीवर कोसळू शकते, असं रॉसकॉसमॉसचं म्हणणे आहे. 



धक्कादायक म्हणजे, ISS कोसळले तर त्याचा रशियाला कोणताही धोका नाही. उलट चीन, भारत किंवा अमेरिकेवर ते कोसळेल, असा दावाही करण्यात आला आहे. तर कॅनडा आणि युरोपियन अंतराळ संस्थेच्या सहकार्याने अंतराळ केंद्र कार्यरत ठेवले जाईल, असा दावा नासाने केला आहे. मात्र, रशियन शास्त्रज्ञांनी इशारा दिल्याने अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधाचे काय होणार, याचीच चर्चा आहे.