किव्ह : Russia Ukraine War : रशिया विरोधात युक्रेनने अजूनही पराभव पत्करलेला नाही. पण कमी ताकद असूनही युक्रेन एवढा लढा कसा देतोय याचं सिक्रेट आता समोर आले आहे. (Russia-Ukraine latest updates) अमेरिकेने या युद्धात युक्रेनला थेट मदत केल्याचं उघड झालंय. ही मदत कोणत्या स्वरूपात होती, त्याचा लाभ युक्रेनला कसा झाला झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियासमोर युक्रेनने अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. याचं सिक्रेट म्हणजे अमेरिका. अमेरिका थेट युद्धात सहभागी झाली नाही पण अमेरिकन गुप्तहेरांनी रशियन आर्मीचं कंबरडं मोडले आहे. अमेरिका केवळ युक्रेनला शस्त्रास्त्र आणि दारूगोळा पुरवत आहे असं चित्रं निर्माण केलं गेलं. पण अमेरिकेचे गुप्तहेर युद्धभूमीवर सावलीसारखे रशियन आर्मीच्या मागावर होते. संधी मिळेल तिथे त्यांनी वार केला आणि पुतीनचे खास असे 8 जनरल्स ठार मारले. हे युद्ध पुतीनसाठी चांगलंच महागडं ठरतंय. रशियाचे जवळपास  15 ते 22 हजार सैनिक या युद्धात ठार झालेत. रशियाचे सीनियर ऑफिसर्स बहुतेक करून अमेरिकन गुप्तहेरांनी लक्ष्य केले. 


अमेरिकन गुप्तहेरांच्या इनपूट्सवरुन रशियाने जवळपास 317 ज्युनिअर लेफ्टनंट रँकचे तसंच त्याहून वरच्या रँकचे आर्मी ऑफिसर्स युक्रेनने मारले. तिस-या श्रेणीतले सर्वाधिक ऑफिसर्स मारले गेलेत. यात रशियाचे अतिवरिष्ठ पदावरचे 8 जनरल्स ठार झालेत. यात ब्लॅक सी फ्लीटच्या डेप्युटी कमांडरचाही समावेश आहे. 


13 एप्रिलला रशियाचे ऑफिसर कर्नल मिखाईल नागामोव्ह यांना युद्धात वीरमरण आलं. त्याआधी कर्नल अलेक्झांडर चिरवा हे युद्धात ठार झाले. या दोन बड्या अधिका-यांच्या मृत्यूमुळे रशियाला चांगलाच धक्का पोहोचला आहे. रशियन अधिका-यांचा माग काढून त्याची इनपूट्स देण्यात अमेरिकन गुप्तहेरांनी चांगलाच जोर लावलाय. या तडाख्यामुळे रशियाचं कंबरडंच मोडले आहे.