कीव : Russia Ukraine War Update: रशिया-युक्रेन युद्ध सुरुच आहे. दरम्यान, युक्रेनने राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) हे कोठेही गेलेले नाहीत. ते राजधानी कीवमध्येच आहेत. रशियन मीडियाच्या बातम्या चुकीच्या आहेत, असे युक्रेनकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, रशियन सैन्याने कीववर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीव येथील एका इमारतीवर सलग पाच रॉकेट डागण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशिया आणि युक्रेनमध्ये सलग 9 दिवस युद्ध सुरू आहे. रशियाच्या लष्करी कारवाईमुळे युक्रेन या पूर्व युरोपीय देशाला चांगलाच फटका बसला असून या हल्ल्यांनंतर परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी सातत्याने मोहीम राबवली जात आहे.  


रशियन मीडियाच्या बातम्या चुकीच्या!


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky)  देश सोडून पळून गेल्याचा रशियन मीडियाचा दावा युक्रेनने फेटाळला आहे. युक्रेनने स्पष्ट केले की अध्यक्ष झेलेन्स्की सध्या राजधानी कीवमध्ये आहेत.



झेलेन्स्की पोलंडमध्ये गेल्याचा दावा


युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याचा दावा रशियन मीडियाने केला आहे. (Volodymyr Zelensky left Ukraine for Poland) झेलेन्स्की हे पोलंड गेले, असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या वृत्तात तथ्य नसल्याचे युक्रेनने म्हटले आहे. 


दरम्यान, युक्रेनच्या एका सरकारी कंपनीने सांगितले की, अणु प्रकल्पावरील रशियन हल्ल्यात युक्रेनचे तीन सैनिक मारले गेले तर दोन जखमी झालेत.