रशियन गुप्तचर संघटनेचा सनसनाटी दावा, पुतीन यांच्या हत्येसाठी यांना `सुपारी`
Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धामध्ये एक सनसनाटी आरोप झाला आहे. युक्रेन युद्धात रोज नवनवे आरोप केले जात आहेत.
मास्को : Russia Ukraine War : युक्रेन-रशिया युद्धामध्ये एक सनसनाटी आरोप झाला आहे. युक्रेन युद्धात रोज नवनवे आरोप केले जात आहेत. आता तर रशियाने या युद्धामध्ये थेट इस्त्रायलची गुप्तहेर संघटना 'मोसाद'लाही ओढले आहे. नेमका काय प्रकार आहे, यावर हा स्पेशल रिपोर्ट.
इस्त्रायलची गुप्तहेर संघटना 'मोसाद'ला व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा दावा रशियाच्या गुप्तहेर संघटनेने केला आहे. हल्ल्याला एवढे दिवस होऊनही युक्रेनची राजधानी कीव्ह संपूर्णपणे रशियाच्या अधिपत्याखाली आलेली नाही.
रशियाचे तीव्र हल्ला बघता राजधानीचा कधीही पाडाव होऊ शकतो आणि वोलोदिमीर झेलेन्स्की एकतर पकडले जातील, मारले जातील किंवा त्यांना पळून जावं लागेल अशी भीती पाश्चिमात्य देशांना आहे. त्याआधी युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांच्या हत्येचा कट शिजल्याचा दावा रशियाची गुप्तहेर संघटना FSBने केला आहे. या हत्येसाठी इस्त्रायलची गुप्तहेर संघटना 'मोसाद'ला सुपारी दिल्याचा आरोप होतोय.
दुसऱ्या देशात जाऊन घातपात करण्यामध्ये मोसाद अत्यंत तरबेज आहे. शिवाय रशियाच्या या दाव्यामागे 'ज्यू' कनेक्शन आहे. झेलेन्स्की हे स्वतः ज्यू आहेत आणि त्यामुळे मोसाद त्यांच्या मदतीला आल्याचा दावा रशियाने केला आहे.
अमेरिकेचा मित्र असलेल्या इस्त्रायलला आपल्या बाजुनं वळवण्यासाठी झेलेन्स्की 'नाझी' असल्याची टीका काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी केली होती. FSBच्या दाव्याला इस्त्रायल किंवा मोसादनं कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. मात्र आता खतरनाक मोसादचं नाव पुढे आल्यामुळे या युद्धाला नवे वळण लागले आहे.