vladimir putin : रशियाच्या अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (vladimir putin) यांच्यासोबत मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रशिया देशातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान पुतीन यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. लवकरच ते बरे होतील अशी प्रार्थना नागरीक करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) हे त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना खाली पडल्याची घटना घडलीय. IANS च्या रिपोर्टनुसार, जनरल SVR चॅनलने दावा केला आहे की, कर्करोगाने ग्रस्त 70 वर्षीय रशियन नेता बुधवारी संध्याकाळी त्यांच्या मॉस्को येथील घरी पायऱ्या उतरत असताना त्यांच्या निवासस्थानी कोसळल्याची घटना घडली. राष्ट्रपतींच्या अंगरक्षकासमोर ही घटना घडली. 


दरम्यान तत्काळ अंगरक्षकांनी पुतीन (vladimir putin) यांची काळजी घेतली आणि लगेचच डॉक्टरांच्या एका टीमला पाचारण केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र पुतीन (vladimir putin) यांना कुठे आणि किती दुखापत झाली हे डॉक्टरांनी सांगितले नाही. पुतीन यांच्या कथित कर्करोगाने ग्रस्त असलेल्या दाव्यांदरम्यान, त्यांचे पडणे ही चिंतेची बाब मानले जात आहे.


नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाच्या काळात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की सातत्याने रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहेत. झेलेन्स्की हार मानायला तयार नाही. त्यामुळे अशा प्रदीर्घ युद्धाचा परिणाम आता रशियाचे अध्यक्ष पुतीन (vladimir putin) यांच्या आरोग्यावरही होत असल्याचे बोलले जात आहे.