26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, नवऱ्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले तरीही...
Russian 22 Children Mother: 26 वर्षीय रशियन महिला क्रिस्टीना ओझटर्क जॉर्जियामध्ये राहते. तिला 22 मुलं आहेत पण तिला हा आकडा 3 अंकांवर म्हणजेच 100 वर न्यायचा आहे.
Russian 22 Children Mother: जगभरातील वाढती लोकसंख्या पाहून आई-वडिल अपत्यांच्या बाबतीत 'हम दो हमारे दो' चा निर्णय घेतात. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेनंतर, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. याच कारणामुळे आजकाल महिलांना एकापेक्षा जास्त मूल नको असते. पण एका रशियन महिला याला अपवाद ठरत आहे. तिने एक किंवा दोन नव्हे तर 22 मुलांना जन्म दिला. ही महिला केवळ 26 वर्षांची आहे.
26 वर्षीय रशियन महिला क्रिस्टीना ओझटर्क जॉर्जियामध्ये राहते. तिला 22 मुलं आहेत पण तिला हा आकडा 3 अंकांवर म्हणजेच 100 वर न्यायचा आहे.मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत तिला शतक करायचं आहे. 26 वर्षीय महिलेला 22 मुलं कशी होऊ शकतात हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पण तिला 100 मुलांना जन्म द्यायचाय हे ऐकून अनेकांना धक्काच बसतोय..
मोठी 8 वर्षांची मुलगी व्हिक्टोरियावेळी क्रिस्टीनाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली होती. मात्र त्यानंतरची सर्व 21 मुले सरोगसीद्वारे जन्माला आली. या 21 पैकी 20 मुलांचा जन्म 2020 मध्ये झाला होता. ती त्या सर्वांवर खूप प्रेम करते.
105 मुले हवीयत
2021 मध्ये ओझटर्क परिवाराना त्यांच्या सर्वात लहान मुलगी ऑलिव्हियाचे स्वागत केले. मला माझ्या करोडपती पतीपासून 105 मुले हवी आहेत, असे ती सांगते. क्रिस्टीनाचा नवरा तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठा आहे. 58 वर्षीय गॅलिप ओझतुर्क हे हॉटेलचा मालक आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याला 8 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. त्याच्यावर बेकायदेशीर ड्रग्ज खरेदी आणि बाळगल्याचा आरोप होता. हे दाम्पत्य सरोगसीच्या मदतीने आपल्या मुलांना जन्म देत आहे. त्यामुळे तुरुंगात असतानाही गालीप बाप होणार आहे.
एकट्याने मुलांची काळजी
क्रिस्टीना जॉर्जियाच्या बटुमी शहरात सुट्टी घालवत असताना गॅलिपला भेटली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये क्रिस्टीनाने एक पुस्तक लॉन्च केले, ज्यामध्ये तिने मेगा-मॉम होण्याचा तिचा अनुभव शेअर केला. जेव्हापासून तिच्या पतीला अटक करण्यात आली तेव्हापासून तिला मुलांची काळजी एकटीनेच घ्यावी लागते. पती घरी नसल्यामुळे मला खूप एकटे वाटते असे तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत सांगितले.
मार्च 2020 ते जुलै 2021 दरम्यान त्यांनी सरोगेट्सना 1.4 कोटी रुपये दिले होते. एकेकाळी, घरात 16 सुईण एकत्र काम करत होत्या, ज्यांना एकूण 68 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जात होता, असे द सन वेबसाइटच्या फॅब्युलस मॅगझिनशी बोलताना त्यांनी सांगितले होते.