तुमच्यासाठी किती फायदेशीर? कोणत्या लोकांच्या आरोग्यासाठी आहे धोकादायक
Sabudana for Health : साबुदाणाचे वेगवेगळे पदार्थ खाणं प्रत्येकाला आवडतं... पण साबुदाण्याचे पदार्थ खाणं आवडत असलं तरी अनेकांनी ते खायला नको... त्याचं कारण काय हे जाणून घेऊया...
Sabudana for Health : उपवासाच्या काळात, बहुतेक लोक साबुदाण्याचे पदार्थ खातात. भारतात घराघरात पूर्वीपासूनच साबुदाणा हा लोकप्रिय आहे. साबुदाणा वडा, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर व्यतिरिक्त यासारख्या पदार्थांचा आनंद घेतात. अनेक लोक तर साबुदाण्याचे पदार्थ हे फक्त उपासाच्या दिवशीच नाही तर मध्येच कधी इच्छा झाली तरी खातात. साबुदाण्यात शरिराला महत्त्वाचे असणारे व्हिटामिन्स आणि मिनिल्स असतात.
साबुदाणा आपल्या आरोग्यासाठी खरचं आहे फायदेकारक?
साबुदाणा खाल्यानं आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात असे म्हटले जाते. कारण त्यात अनेक पोषक घटक असतात. मात्र, साबुदाणा खरोखरच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अलीकडेच लेखक क्रिश अशोक यांनी इन्स्टाग्रामवर साबुदाणा खाल्ल्याने आरोग्यावर होणाऱ्या परिणामांविषयी सांगण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांच्या मते आरोग्याच्या दृष्टीकोनातून साबुदाणा आरोग्यासाठी फायदेकारक नाही. तर साबुदाना आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे का म्हटले जाते हे जाणून घेऊया...
साबुदाणा खाणे का टाळावे?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, साबुदाणा एक रिफाइंड स्टार्च आहे. शुद्धीकरणामुळे, ते रक्तप्रवाहात त्वरीत शोषले जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. इतकंच नाही तर साबुदाणा हा पारंपारिक खाद्य पदार्थांपैकी एक नाही.साबुदाणा जवळपास 1940 आणि 50 च्या दशकात भारतात आला. हा पदार्थ मूळचा दक्षिणपूर्व आशियातील आहे.
हेही वाचा : पावसाळ्यात मेकअप करताना घ्या 'ही' काळजी
तर साबुदाणा हा रिफाइंड स्टार्चचा एक प्रकार आहे. इतकंच काय तर साबुदाण्याचे सेवण केल्यानं हाय ग्लायसेमिक अन्न पदार्थ मानले जाते. हृदयरोगी म्हणजेच हाय बीपी, मधुमेहीचे रुग्ण यांनी साबुदाण्याचे सेवण करणे टाळायला हवे.
कधी आणि कसे करु शकता साबुदाण्याचे सेवण?
तुम्हाला जर चयापचय म्हणजे अन्न पचन होण्याची समस्या किंवा मधुमेहाशी संबंधित समस्या नसेल, तर तुम्ही संतुलित आहाराचा भाग म्हणून अधूनमधून साबुदाण्याचे सेवण करू शकता. त्यात फायबर किंवा विरोधी पोषक घटक नसल्यामुळे ते संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दरम्यान, साबुदाण्याच्या कोणत्याही पदार्थाचे सेवण करायचे झाल्यास ते कमी प्रमाणातच करा. कारण आरोग्यासाठी जे सगळे महत्त्वाचे घटक आहेत ते त्यात नाहीत. त्यामुळे बॅलेन्स्ड डायट असेल तर तुम्ही महिन्यातून एक किंवा दोनवेळा साबुदण्याच्या पदार्थांचे सेवण करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)