सौदी अरबच्या सर्वात श्रीमंत आणि ताकदवान राजकुमाराला अटक
सौदी अरबमध्ये भ्रष्टाचारा विरोधात देण्यात आलेल्या दणक्यात अरबच्या राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अर्थातच याचा परिणाम आजूबाजूच्या देशांवरही पडेल.
रियाद : सौदी अरबमध्ये भ्रष्टाचारा विरोधात देण्यात आलेल्या दणक्यात अरबच्या राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अर्थातच याचा परिणाम आजूबाजूच्या देशांवरही पडेल.
शनिवारी सौदी अरबचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी एका भ्रष्टाचार प्रकरणी नॅशनल गार्ड प्रमुख राजकुमार मुतैब बिन अब्दुल्लाला बर्खास्त केलं आहे. त्याच्यासोबत इतर ११ राजकुमारांनाही अटक करण्यात आलीये. ही कारवाई देशात भ्रष्टाचार विरोधी एक कमिटी तयार करण्यात आल्यानंतर काही वेळातच करण्यात आली. या कमिटीचं अध्यक्षपद क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे आहे.
अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये अरबपती उद्योगपती अल-वलीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. याआधी सप्टेंबरमध्ये प्रभावशाली उलेमा आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आणि ३२ वर्षीय मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेवर आपली पकड मजबूत केली होती. दरम्यान, मोहम्मद बिन सलमान सरकारच्या सर्वच मुख्य भागांवर नियंत्रण मिळवत आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईनुसार राजकुमार मुतैब बिन अब्दुल्लाह याना नॅशनल गार्ड पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांना या पदावरून हटवल्याने देशातील सुरक्षा संस्थांवर राजकुमार मोहम्मदची पकड आणखी मजबूत होईल. जूनमध्ये मोहम्मद बिन सलमान यांनी गादी मिळवण्यासाठी आपला ५८ वर्षीय चुलत भाऊ राजकुमार मोहम्मद बिन नायफला बाजूला केले होते.
प्रिन्स तलालने जगभरात गुंतवणूक केली आहे. त्यानी बिल गेट्सपासून ते रूपर्ट मर्डोक आणि मायकल ब्लूमबर्गसारख्या कॉर्पोरेट वर्ल्डमधील मोठ्या लोकांसोबत बिझनेस केला आहे. ब्लूमबर्ग बिलिअनेअर इंडेक्सनुसार, १९ अरबची संपत्ती असलेला हा राजकुमार जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत ५०व्या स्थानावर आहे.
सर्वात श्रीमंत राजकुमार :
अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये अरबपती उद्योगपती अल-वलीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. त्यांचं नाव जगातल्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींमध्ये आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी जगातली सर्वात उंच इमारत बनवण्याची घोषणा केली होती. अल-वलीदजवळ जगातलं सर्वात महागडं विमान आहे. त्याला लोक उडतं महलही म्हणतात. ३०० पेक्षा जास्त महागड्या कारचं कलेक्शन त्याच्याकडे आहे. त्यांच्या एका कारमध्ये हिरे लावण्यात आल आहेत या कारची किंमत ३२ कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.