पृथ्वीपासून 388000000000000 किमी दूरवर जीवसृष्टीचे संकेत? `या` दुर्बिणीमुळं समोर आलं सत्य
Super Earth Planet : पृथ्वीच्या बाहेर, अवकाशातील प्रत्येक रहस्य अनेकांसाठीच अनाकलनीय असतं. खगोलीय रचना आणि त्या रचनांचं जीवसृष्टीशी असणारं नातं अनेक प्रश्नांना वाव देऊन जातं.
Super Earth Planet : अवकाश (Space news) हा विषय आतापर्यंत अनेक शोधांची जननी ठरला आहे. कारण, अवकाळाप्रती असणाऱ्या प्रश्नांच्याच माध्यमातून काही कुतूहलपूर्ण प्रश्नांमुळं अनेक संकल्पना आणि अनेक गूढ रहस्य जगासमोर आली आहेत. शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांनी केलेल्या निरीक्षणाच्या बळावर या विश्वाची उत्पत्ती कशी झाली आणि क्षणाक्षणाला अवकाशातही नेमक्या काय आणि किती हालचाली सुरु आहेत यासंदर्भातील माहितीसुर्धा वेळोवेळी समोर आली आहे. सध्याच्या घडीला हे संशोधन अशा एका वळणावर आलं आहे जिथं ही मंडळी पृथ्वीच्याही पलिकडे असणाऱ्या ग्रहांवर जीवसृष्टी शोधताना दिसत आहेत.
सूर्यमालेमध्ये नुकतच संशोधकांना एका अशा ग्रहाची माहिती मिळाली आहे जिथं जीवसृष्टीचे संकेत मिळत आहेत, कारण तिथं वातावरणनिर्मितीस पूरक स्थिती दिसत आहे. पृथ्वीपासून तब्बल 388 trillion km अर्थात 388000000000000 किमी दूर, अगदीच सोप्या शब्दांत सांगावं तर 41 प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या या एक्सोप्लॅनेटचं नाव आहे 55 Cancri e. NASA च्या वतीनं करण्यात आलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली जिथं या सुपर अर्थचा आकार पृथ्वीहून दुप्पट असल्याचं पाहायला मिळत आहे.
पृथ्वीहून घनता कमी असणारा हा 55 Cancri e ग्रह त्या पाच ताऱ्यांपैकी एक आहे जो कर्क आकाशगंगेमध्ये सूर्यासारख्याच एका ताऱ्याभोवती परिक्रमण करतो. Nature जर्नलमध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार या कॅनक्रिए ग्रहाच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईडचं अधिक प्रमाण दिसत आहे.
सध्या एस्ट्रोफिजिसिस्ट्सच्या माहितीनुसार त्यांनी या ग्रहाची गणती super earth विभागात केली आहे. या ग्रहाची रचना आपल्या सूर्यमालेतील ग्रहांसारखीच असून, त्याचं तापमान 2,300 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजेच सध्या तिथं जीवसृष्टीचे पुरावे सापडले नाहीत. पण, नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोप या दुर्बिणीतून करण्यात आलेल्या संशोधनानुसार वातावरणाचा दाट थर असणाऱ्या पर्वतीय रचनांच्या इतर ग्रहांमध्येही जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते.
हेसुद्धा वाचा : माजी मुख्यमंत्र्यांच्या भाच्याशी लग्न करणाऱ्या अभिनेत्रीनं सोसल्या नरकयातना; कोण होती ती सौंदर्या?
या नव्या ग्रहावरही महासागर...
पृथ्वीहून आठपट मोठ्या असणाऱ्या या ग्रहाचं पृष्ठ मॅग्मा महासागरानं झाकोळला आहे. इतकंच नव्हे, तर या ग्रहाची उष्णता त्याच्या पृष्ठावर समप्रमाणात पसरली आहे. याच ग्रहामुळं आता पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह नेमके कसे तयार झाले हे लक्षात येणार आहे. ज्यामुळं हे संशोधन अवकाश क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे.