मेलबर्न : वैज्ञानिकांच्या दुनियेतला पहिला कृत्रीम बुद्धीवाला नेता विकसीत झाला आहे. हा रोबोट राजकारण आणि स्थानिक मुद्द्यांबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. एवढच नाही तर २०२०ला न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवार होण्याची तयारीही रोबोनं केली आहे.


या रोबोचं नाव सॅम आहे. सॅमला न्यूझीलंडच्या निक गेरिट्सन यांनी बनवलं आहे. हा रोबो फेसबूक मेसेंजरच्या सहाय्यानं हा रोबो नागरिकांना प्रतिक्रिया द्यायला शिकत आहे. २०२०च्या शेवटी न्यूझीलंडमध्ये निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत सॅम उमेदवार म्हणून मैदानात उतरण्यासाठी तयार असेल, असा विश्वास निक गेरिट्सन यांनी व्यक्त केला आहे.