Scientist Found Super Earth: मानवाला कायमचं ब्रम्हांडाबाबत कुतुहूल राहिलं आहे. आपल्या पृथ्वीसारखं जग इतर ग्रहांवर आहे का? याचा शोध अनेक दशकांपासून शास्त्रज्ञ घेत आहेत. याबाबत वेळोवेळी अनेक अपडेट समोर आले आहेत. पृथ्वीसारख्या ग्रहाचा शोध सुरू असतानाच खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. खगोलशास्त्रज्ञांनी 'सुपर अर्थ' शोधली आहे. या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी टिकून राहिल, अशी अपेक्षा आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने विज्ञान कार्य सुरू केल्यामुळे भविष्यातील निरीक्षणांसाठी हे महत्त्वाचे लक्ष्य असू शकते. पण हा ग्रह राहण्यायोग्य क्षेत्रामध्ये आणि बाहेर फिरत राहतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन ग्रह पृथ्वीपासून सुमारे 37 प्रकाश-वर्षे अंतरावर स्थित आहे. हा ग्रह स्वतः पृथ्वीच्या वस्तुमानाच्या चौपट आहे, त्याच्या मध्यवर्ती ताऱ्यापासून पृथ्वी-सूर्य अंतराच्या सरासरी अंतर 0.05 पट आहे. नव्याने शोधलेल्या एक्सोप्लॅनेटचे वस्तुमान पृथ्वीच्या जवळपास चौपट आहे आणि नवीन इन्फ्रारेड मॉनिटरिंग तंत्र वापरून शोधण्यात आले आहे. या ग्रहावर जीवन अस्तित्वात आहे की नाही? याबाबत संशोधन केलं जातं आहे. त्याचबरोबर ग्रहाभोवतालचं वातावरण कसं आहे? याबाबत शोध घेतला जात आहे. 



संशोधकांचे म्हणणे आहे की ब्रह्मांडातील जीवनाचा अभ्यास करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. परंतु ते दृश्य प्रकाशमान खूप कमी असल्यामुळे त्यांचे निरीक्षण करणे कठीण आहे. या ताऱ्यांच्या पृष्ठभागाचे तापमान 4000 अंशांपेक्षा कमी आहे. सुपर अर्थ शोधण्यासाठी, शास्त्रज्ञ ट्रान्सिट पद्धतीचा अवलंब करतात. या प्रक्रियेत जेव्हा एखादा ग्रह ताऱ्यासमोरून जातो तेव्हा ताऱ्याच्या प्रकाशामुळे तो ग्रह चमकतो. अंतराळ दुर्बिण या प्रकाशाचे चढउतार मोजतात आणि त्या ग्रहाच्या वातावरणाचा आकार, वेग आणि रचना विकसित करतात.