Moon: खरचं चंद्रावर पाणी आहे? शास्त्रज्ञांना सापडला आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा
Water On Moon : चंद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो दशलक्ष लिटर पाणी सापडल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. चंद्रावर असलेल्या काचेसारख्या थरात पाण्याचे थेंब गोठल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने एक मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत चांगई 5 रोव्हर मिशन यान चंद्रावर पाठवण्यात आले.
Water On Moon : मनुष्याचे चंद्रावर रहायला जाण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारण साश्त्रज्ञांना आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा सापडला आहे. हवा अर्थात ऑक्सिजन आणि पाण्याशिवाय कोणताही सजिव जग शकत नाही. यामुळे चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबत शाश्त्रज्ञ संशोधन करत आहेत. त्यांच्या या संशोधाला यश मिळाले आहे. चंद्रावर हजारो लिटर पाणी असल्याचा अंदाज शास्त्रत्रांनी वर्तवला आहे (Water On Moon).
चंद्राच्या पृष्ठभागाखाली हजारो दशलक्ष लिटर पाणी सापडल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांकडून करण्यात आला आहे. चंद्रावर असलेल्या काचेसारख्या थरात पाण्याचे थेंब गोठल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. चीनच्या अंतराळ संस्थेने एक मोहिम राबवली आहे. या मोहिमे अंतर्गत चांगई 5 रोव्हर मिशन यान चंद्रावर पाठवण्यात आले.
चंद्रावर 30 हजार कोटी लिटर पाणी असल्याचा दावा
डिसेंबर 2020 याच रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीचे नमुने पृथ्वीवर संशोधनासाठी पाठवले होते. यानंतर आता चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीमध्ये काचेसारखे अनेक मणी आढळले आहेत. या काचेच्या मण्यांमध्ये पाणी असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या काचेच्या मण्यांमध्ये जवळपास 30 हजार कोटी लिटर पाणी असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. 27 मार्च 2023 रोजी प्रकाशित झालेल्या नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये या संशोधनाबाबत माहिती देण्यात आली आहे.
चंद्रावरील हे काचेचे मणी कसे तयार झाले?
या काचेच्या मण्यांना वैज्ञानिक भाषेत ग्लास स्फेरुल्स किंवा इम्पॅक्ट ग्लासेस किंवा मायक्रोटेकटाईट्स म्हणतात. लक्षावधी किलोमीटर प्रति तास या वेगाने उल्का चंद्रावर आदळतात तेव्हा हे अशा प्रकारच्या काचेचे मणी तयार होत असतात असे शास्त्रज्ञांनी सांगितले. उल्का आणि चंद्र यांच्यात टक्कर होऊन मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. सिलिकेट खनिजे वितळतात यानंतर ते थंड होतात यापासून काचेचे मणी तयार होतात.
काचेच्या मण्यांमध्ये पाणी कसे तयार होते?
या काचेच्या मण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असते. सौर वारा वाहताना हायड्रोजन ऑक्सिजनमध्ये परावर्तित होतो. यामुळे या काचेच्या मण्यांमध्ये पाणी असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबतचे संशोधन लवकरच पूर्ण होणार आहे. या संशोधनात यश आल्यास मानवाचे चंद्रवर वास्तव्य करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.