गुगलविषयीच्या काही रंजक गोष्टी माहितीयेत?
गुगलचा वाढदिवस कधी असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का?
मुंबई : कठिणातील कठीण प्रश्नाचं उत्तर कोणाकडे मिळत नसल्यास शेवटचा आधार असतो तो म्हणजे एका हक्काच्या ठिकाणाचा. एक असं ठिकाण किंवा एक अशी अदृश्य व्यक्तीच म्हणा जिच्याक़डे सर्वच प्रश्नांची उत्तरं असतात. कोणत्या प्रश्नाचं उत्तर नाही, असं या हक्काच्या ठिकाणी होत नाही. कोणत्याही गोष्टीची माहिती नसणाऱ्यांपासून मोठमोठ्या तज्ज्ञांपर्यंत प्रत्येकानेच एकदातरी मदतीसाठी धाव घेतलेलं हे ठिकाण म्हणजे गुगल.
गुगलला सर्व माहित आहे, असं म्हणत आपण मोठ्या दिमाखात याच गुगलकडून बहुविध विषयांची माहिती घेत असतो. पण, याच गुगलचा वाढदिवस कधी असतो हे तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना.... हरकत नाही. चला नजर टाकूया आजच्याच दिवशी २१ वर्षे पूर्ण झालेल्या याच गुगलविषयीच्या काही रंजक गोष्टींवर...
'गोगोल' या शब्दावरुन गुगल हा शब्द मिळाला आहे. क्रमांक एक असा या शब्दाचा अर्थ होतो. गुगल जास्तीत जास्त किवर्ड्सच्या बळावर एखादी गोष्ट शोधू शकतो हेच दाखवून देण्यासाठी हा शब्द उदयास आला.
पहिलं गुगल डूडल हे १९९८ मध्ये बर्निंग मॅन फेस्टिव्हलच्या वेळी साकारण्यात आलं होतं. हे अमेरिकेतील एक आर्ट फेस्टीव्हल आहे.
कॅलिफोर्नियातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये गुगलं मुख्यालय आहे. या मुख्यालयात असणाऱ्या उद्यानांमध्ये असणारं गवत कापण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जात नाही. तर, असं म्हणतात की गुगलने यासाठी बकऱ्या पाळल्या आहेत.
गुगल ही एक अशी मोठी टेक कंपनी आहे, जी कर्मचाऱ्यांना मोफद खाणं पुरवते. इतकंच नव्हे तर, कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या पाळीव कुत्र्यांना आणण्याचीही मुभा आहे.
गुगलकलकडून १ एप्रिल २००४ मध्ये पहिली जीमेल सेवा सुरु करण्यात आली होती. एप्रिल महिना असल्यामुळे सर्वांना वाटलं हे एप्रिल फूलचं प्रकरण असल्याचं वाटलं ज्यामुळे पहिल्यांदाच जीमेलला कोणी गांभीर्याने घेतलं नाही.
२००६ मध्ये युट्यूब गुगलच्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग झालं. जे १०० कोटी डॉलर्स किंमतीला खरेदी करण्यात आलं होतं.
गुगलवर होणाऱ्या सर्चमध्ये जवळपास १५ टक्के सर्च अगदी नवे असतात. मुख्य़ म्हणजे आता गुगल अनेक नव्या क्षेत्रांमध्ये उतरलं आहे. जे पाहता गुगल म्हणजे.....'क्या बात', असंच म्हणावं लागेल.