Second World War Bomb : दुसऱ्या विश्वयुद्धानं जगात एकच हाहाकार माजला होता. इतका, की अनेकजण त्या कटू आठवणींना आयुष्यात स्थानही देत नाहीत. मोठ्या प्रमाणात झालेल्या नरसंहारामध्ये या महायुद्धानं क्रूरतेचा असा चेहरा जगापुढं आणला ज्यामुळं आजही ते दिवस आठवून अनेकांच्याच मनात धडकी भरते. अशाच या दुसऱ्या महायुद्धातील एक महाभयंकर गोष्ट पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेन्मार्कमधील लँगलँड या बेटानजीक पाण्यामध्येच दडलेल्या एका बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. BBC च्या वृत्तानुसार एका मच्छिमाराला मासे पकडताना अचानकच जाळ्यात एक जड वस्त लागल्याचं जाणवलं. पाहतो तर, ही 130 किलोग्रॅमची वस्तू एक घातक हत्यार असल्याचं जाणवताच त्यानं तातडीनं अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आणि हा एक जिवंत बॉम्ब असल्याचं उघड झालं


सदरील माहिती मिळताच डॅनिश नौदलानं तातडीनं कारवाई करत हा बॉम्ब पुन्हा पाण्यात टाकला आणि त्यासोबत 10 किलो स्फोटक जोडली ज्यामुळं या बॉम्बचा स्फोट करणं शक्य झालं. संरक्षण विभागाच्या माहितीनुसार समुद्राच्या पृष्ठापासून 15 मीटर खाली म्हणजेच साधारण 49 फुटांवर हा भयंकर स्फोट झाला. 



दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही 


यापूर्वीही जगाला हाजरवणाऱ्या वास्तवाच्या रुपात दुसऱ्या महायुद्धातील बऱ्याच गोष्टी जगासमोर आल्या होत्या. सिंगापुरमध्येही या महायुद्धातील एक बॉम्ब कैक वर्षांनी सापडला होता. एका बांधकामादरम्यान हा बॉम्ब 26 सप्टेंबर रोजी सापडला असून त्याचं वजन 100 किलोग्राम इतकं होतं. ज्यानंतर या बॉम्बचाही स्फोट करण्यात आला होता. एएफपीच्या माहितीनुसार या निर्धारित स्फोटापूर्वी आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या साधारण 4000 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं होतं. 


हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 पृथ्वीच्या दिशेनं परततंय; इस्रोनं Photo शेअर करत दिली मोठी अपडेट 


इतकंच नव्हे तर, असाच एक पण स्फोटकंविरहत हवाई बॉम्ब सिंगापूरच्या उत्तरपूर्व उपनगरात म्हणजेच बुकित तिमाह येथे सापडला होता. या बॉम्बला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेणं सुरक्षित नसल्यामुळं अखेर संरक्षण यंत्रणांनी त्याला तिथंच नष्ट केलं होतं.