वयाच्या 7 व्या वर्षी बनली कोट्यवधींची मालकीन, संपत्ती ऐकून तुम्हाला बसेल धक्का
अनास्तासियाचा जन्म 2014 मध्ये झाला होता, तिला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे समजल्यानंतर परिणामी, तिच्या पालकांनी नोकरी सोडली
मुंबई : फोटोमध्ये तुम्हाला जी लहान मुलगी दिसतेय. ती एक कंटेन्ट क्रियेटर आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल परंतु या मुलीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर आहेत. यामुळेच ही मुलगी वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी कोट्यवधींची मालकीन बनली आहे. तसेच ती सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून देखील इंटरनेटवर ट्रेंड होऊ लागली आहे. या लहान मुलीचे अनास्तासिया रॅडझिस्काया असे नाव आहे.
ही रशियन मुलगी सोशल मीडिया स्टार आहे. तिचे व्हिडिओ लाखो वेळा पाहिले जातात, ज्यामुळे ती दरमहा 1 कोटींहून अधिक कमाई करत आहे. या सात वर्षांच्या मुलीकडे 140 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची संपत्तीची आहे.
अशी झाली यूट्यूब चॅनेलची सुरुवात
अनास्तासियाचा जन्म 2014 मध्ये झाला होता, तिला न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असल्याचे समजल्यानंतर परिणामी, तिच्या पालकांनी नोकरी सोडली आणि मुलीसाठी लाइक नास्त्य नावाचे YouTube चॅनेल सुरू केले. याची सुरूवात अनास्तासियासाठी शैक्षणिक प्रकल्प म्हणून केली गेली.
गेल्या वर्षी 200 कोटींची कमाई!
यूट्यूबच्या लोकप्रिय कंन्टेन्ट क्रियेटरच्या यादीत अनास्तासियाचा समावेश झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी तिने जवळपास 200 कोटींची कमाई केली होती. तिच्या या यशामागे इतर कोणी नसून तिच्या आई-वडिलांचा हातभार आहे.
लक्झरी कौटुंबिक हॉलिडेवर व्हिडीओ
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अनास्तासिया तिच्या लक्झरी कौटुंबिक हॉलिडेवर आधारित कन्टेन्ट तयार करते, याला ती YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करते. यामध्ये ती मुलांसाठी पौष्टिक अन्न, विदेशी हॉलिडे आणि महागड्या खाजगी जेट ट्रिप सारखे कन्टेन्ट वापरते.
6 व्या क्रमांकावर
व्हिडीची सुरुवात केल्यानंतर काही वर्षांनंतर युट्युब चॅनलवरून त्यांचे उत्पन्न येऊ लागले. यानंतर, मुलीच्या पालकांनी विविध प्रकारचे कंटेंट तयार करण्यास सुरुवात केली, ज्याचा परिणाम म्हणून अनास्तासिया यूट्यूबच्या टॉप 10 सर्वाधिक सशुल्क कन्टेन्ट क्रियेटरच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचली.
एका व्हिडिओला 90 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले
या मुलीचा कन्टेन्ट लोकांना किती आवडतो, हे तिच्या 4 वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडीओवरुन चांगलाच स्पष्ट होतो. या व्हिडीओला 90 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर त्याच्या चॅनेलला ८६ दशलक्ष लोकांनी सबस्क्राइब केले आहे. तुम्हाला सांगतो, या चॅनलला आतापर्यंत एकूण 6900 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत.