Pakistan पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधीच शाहबाज शरीफ यांचं काश्मीरबाबत मोठं वक्तव्य
शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान होणार आहेत. शाहबाज शरीफ यांच्या समर्थनार्थ 174 मते पडली आहेत.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनताच शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले आहे. काश्मीर प्रश्नावर त्यांनी वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश देत त्यांनी काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे, असे म्हटले आहे. (Pakistan PM shehbaaz sharif on Kashmir issue)
'आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत ते शक्य नाही, असे शाहबाज शरीफ म्हणाले आहे. आम्ही काश्मिरी लोकांना त्यांच्या हातात सोडू शकत नाही. राजनैतिकदृष्ट्या आम्ही काश्मिरी जनतेला आमचा पाठिंबा देत राहू.'
काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसारच सोडवला गेला पाहिजे. त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात, तिथली गरिबी दूर व्हावी. असं ही त्यांनी म्हटलं आहे.
शाहबाज घेणार पंतप्रधानपदाची शपथ
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी निवड केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ 174 मते पडली आहेत. पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर शाहबाज शरीफ आज रात्री ८ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
रिक्त जागांवर पोटनिवडणूक
इम्रान यांच्या पक्षाच्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, रविवारी पीएमएल-एन आणि पीपीपीच्या नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये पीटीआयच्या खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.