धक्कादायक ! चार्जरचा शॉक लागल्याने २ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
धक्कादायक घटनेने अनेकांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं आहे.
मुंबई : ईशान्य ब्राझीलमधील एरेरे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे मोबाईल फोन चार्जरला (Mobile Charger) स्पर्श केल्याने एका 2 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.
द सनच्या वृत्तानुसार, चार्जरचा शॉक लागल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. मुलीला रुग्णालयातही नेण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या लाख प्रयत्नानंतरही तिला वाचवता आले नाही. चार्जर हे कोणत्या ब्रँडेड कंपनीचं होतं की लोकल होतं हे अजून समोर आलेलं नाही.
स्थानिक महापौर इमानुएल गोम्स मार्टिन्स यांनी फेसबुकवर या मुलीला श्रद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले, 'एरेरे सरकार मुलीच्या मृत्यूबद्दल तीव्र खेद व्यक्त करते.' लोकं देखील मुलीच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी 355 मृत्यू
गेल्या वर्षी केवळ ब्राझीलमध्ये विजेच्या धक्क्यामुळे 355 मृत्यू झाल्याची नोंद असताना साराचा मृत्यू झाला आहे. या घटनेपूर्वी 28 वर्षीय तरुणाचाही वीजेच्या झटक्यामुळे मृत्यू झाला होता.