Shocking Video : भारतात रस्ते अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढतं आहे. असा एक दिवस नसतो ज्यादिवशी रस्ते अपघात होत नाही. हे अपघात अनेक वेळा गाडी चालकाच्या चुकीमुळे होतात. तर काही वेळा दुसऱ्यांच्या चुकीमुळे लोकांचा बळी जातो. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना तुम्हा हाय वेवर असे अनेक फलक दिसतात. ज्यात लिहलं असतं, ''गाडी सावकाश चालवा तुमचा जीव महत्त्वाचा आहे.'' ''गाडी सावकाश चालवा घरी तुमची कोणी वाट पाहत आहे,'' अशा आशयाचे फलक तुम्हाला दुर्घटना घडू नये म्हणून सर्तक करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर आपण रस्ते अपघाताचे अनेक थरारक आणि धक्कादायक व्हिडीओ पाहत असतो. सोशल मीडियावर असे अनेक भीषण अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहायला मिळतो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. 


थरारक व्हिडीओ



या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, अचानक एक कार भरधाव वेगाने येऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबाला जाऊन धडकते. हा अपघात इतक्या भीषण होता की कार चक्काचूर झाली. या अपघातात खांबाचे तार तुटून जातात आणि विद्युत पुरवठा बंद होतो.  ही भयानक घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. हा अपघात कुठे झाला याबद्दल काही स्पष्ट कळत नाही. 


हा धक्कादायक व्हिडीओ ट्विटरवर Vicious Videos नावाच्या आईडीवर शेअर करण्यात आला आहे. 13 सेकंदचा हा व्हिडीओ आतापर्यंत 28 हजारपेक्षा अधिक यूजर्सने पाहिला आहे. तर असंख्य लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक यूजर्सने कारचालकाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र या भीषण अपघातात कार चालकाचा जीव वाचण्याची शक्यता फारच कमी आहे.