Viral Story : आपल्या शरीरातील दात हा सर्वात महत्त्वाच्या घटकांपैरी एक. जर दातच नसेल तर आपण खाणार कसं? काही खाल्लं नाही, तर आपण जगणार कसं? म्हणूनच दात हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. समजा तुम्हाला एकही दात नसेल तर? हा विचार कधी तुम्ही स्वप्नातही करणार नाही. कारण तो जवळपास अशक्य आहे. एकदोन दात पडणं, किडणं (Cavity), नव्यानं दात बसवणं हे ठीक. पण ऐन तारुण्यात एका तरुणाचे सर्व दात पडलेयत आणि हे ऐकूनच अनेकांची दातकिळी बसतेय. (teeth Gums health)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपले दात हे वेगवेगळ्या प्रकारच्या Tissues पासून बनलेले असतात. लहानपणी आलेल्या दातांना आपण दुधाचे दात म्हणतो. हे दात 6 ते 12 वर्षांदरम्यान काही कारणांमुळे पडून जातात. अशातच एक घटना समोर आलीये, ज्यात एका व्यक्तीचे सर्वच दात गळून पडलेत. त्याला आता एकही दात उरलेला नाही आणि पुन्हा नव्यानं दात बसवण्यासाठी तब्बल 36 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. 


जेवताना एके दिवशी अचानकच त्याचे दात गळून पडले. ज्यानंतर त्याला काहीही खाणं जवळपास अशक्य झालं होतं. ज्या व्यक्तीची सगळी बत्तिशीच गळून पडली त्याचं नाव आहे अलेक्झेंडर स्टोईलोव. तो इंग्लडच्या (England) ब्रिस्टलमध्ये राहतो. सध्या अलेक्झेंडरचं वय 35 आहे, मात्र सहा वर्षांपूर्वीच जेव्हा तो 29 वर्षांचा होता तेव्हा त्याचे सगळे दात गळून पडले. याबाबत त्याने जेव्हा डॉक्टरला सांगितले तेव्हा सगळेजण चकित झाले. अलेक्झेंडरला काहीच खाता येतं नव्हतं, तो फक्त द्रव पदार्थ (फळांचा ज्युस, नारळ पाणी) पिऊ शकत होता.


एका वृत्तवाहिनीशी बोलताना अलेक्झेंडर म्हणाला, "मला असं वाटत की मला लहानपणापासूनच अँटीबायोटिक दिल्या गेल्या. बहुतेक हे त्याचे साईड इफेक्ट असावेत. त्यामुळे माझे दात कमजोर होऊन गळून पडले आहेत. माझ्या तोंडात आता एकही दात उरलेला नाही आहे. मी जेव्हा ब्रिटनच्या डॉक्टरकडून याबाबतची माहिती घेतली, तेव्हा मला माझ्या जबड्यातून दातांचे मूळ काढावे लागतील आणि त्यासाठी त्याला तब्बल 36 लाख रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं. मात्र जर मी असं केलं तर माझ्या जबड्याच्या हाडांमध्ये (Bone) संसर्ग होऊ शकतो. यामुळे मला अनेक आरोग्य समस्यांचाही सामना करावा लागत आहे."



अलेक्झेंडर पुढे म्हणाला, "मी लहानपणापासूनच माझ्या दातांची चांगली काळजी घेतो. त्यामुळे मला दातांसंबंधी कोणतीही समस्या नव्हती. मात्र जेव्हा माझे दात पडायला लागले मला धक्का बसला. सहा वर्षांपूर्वी मला दातांची कुठलीही समस्या नव्हती. मात्र हळू-हळू माझे दात पडायला सुरूवात झाली. त्यानंतर मला दातात फिलिंग करावी लागली. जेव्हा माझा पहिला दात तुटला तेव्हा मी चकित झालो. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे अशाप्रकारे दात पडतील. मी ब्रेड खात असताना अचानक माझा दात तुटला. त्यानंतर तीन आठवड्याचा आत माझे 10 दात पडले आणि पाहता-पाहता पाच वर्षांच्या आत माझे सगळे दात पडून गेले."


हे प्रकरण ऐकूनही धक्का बसतोय. इथं मुद्दा असा की, लहानपणापासूनच तुम्ही मुलांवर औषधांचा भडीमार करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण त्याचे हे असे विपरित परिणाम दिसणार असतील तर हे योग्य नाही.