नवी दिल्ली : काही धक्कादायक घटनांच्या साखळीमध्ये लोकप्रिय विनोदवीर नजर मोहम्मद अर्थात खासा ज्वान (Khasa Zwan ) यांची बंदुकधाऱ्यानं हत्या केली आहे. या अफगाण विनोदवीराच्या (Afghan comedian) कुटुंबानं या हत्येमागं तालिबान या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा आरोप केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनाय'च्या वृत्तानुसार कंदहार या वादग्रस्त प्रांताशी ज्वान यांचा संबंध होता. गुरुवारी त्यांना घराबाहेर आणत त्यांची हत्या करण्यात आल्याचं वृत्त Tolo News नं प्रसिद्ध केलं आहे. काही काळाआधी कंदहार पोलिसांमध्ये काम करणाऱ्या या विनोदवीराच्या कुटुंबीयांनी सदर घटनेसाठी तालिबानला दोष लावला असला तरीही तालिबानकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. सध्या स्थानिक नागरिक, सुरक्षा यंत्रणांशी सुरु असणाऱ्या तालिबानच्या संघर्षादरम्यानच ही घटना घडल्यामुळं अनेकांना धक्का बसला आहे. 


कशी फसली! टेस्ला कार 'चंद्रा'ला सिग्नल समजली, सारखी ब्रेक मारु लागली


गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या हिंसाचारात वाढ झाली आहे. सध्याच्या घडीला अफगाणिस्तानमधील 419 जिल्ह्यांमधीलतळांपैकी अर्ध्याहून अधिक तळ तालिबानच्या ताब्यात आहेत, आता त्यांना उर्वरित 34 महत्त्वाची तळंही ताब्यात घ्यायचा मनसुबा समोर येत आहे. 



तालिबानची पाळंमुळं आणखी विस्तारत असतानाच अफगाणिस्तानातील संरक्षण यंत्रणाही काबुलसह इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी झटत आहेत.