मुंबई : आपल्याला हे तर माहीत आहे की, सध्या लोक सोशल मीडियावर कन्टेन्ट बनवून पैसे कमऊ लागले आहेत. हे लोक असे काही ना काही कन्टेन्ट तयार करु पाहाता ज्यामुळे त्यांना लाखो व्हयुज आणि शेअर्स मिळतील. सोशल मीडियावरील कन्टेन्ट लोकांचं मनोरंजन करतात म्हणूल लोकं ते आवर्जून पाहातात. आपण हे देखील बऱ्याचदा पाहिलं असेल की, सोशल मीडियावरती प्रसिद्ध होण्यासाठी अनेक लोकं कोणत्याही थराला जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल की व्ह्युज मिळवण्यासाठी अनेक लोकं आपल्या महागड्या गाड्या तोडतात आणि त्यांचे नुकसान करतात. तसेच अनेक लोकं आपले कपडे फाडतात किंवा कापतात आणि त्याच्यापासून अशी स्टाईल करतात जी आपल्याला सर्वसामान्यता वापरणं अशक्य आहे. परंतु लोक ते करतात आणि याचे त्यांना पैसेही मिळतात.


परंतु एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये जास्त युजर्स मिळवण्यासाठी एका महिलेनं आपल्या नवऱ्यासोबत बेट लावली आणि एका मुलाला डेटवर घेऊन गेली.


ही महिला एका अब्जाधीश उद्योगपतीची बायको आहे. ती सोशल मीडियावर फॉलोअर्स मिळवण्यासाठी आपल्या एका चहात्याला घेऊन डेटवरती गेली. एवढंच काय तर यासाठी तिने या फॅनकडूनच अडीच लाख रुपये घेतले.


तिने असं का कालं याचं कारण स्वत:च सांगितलं, ही महिला एक मॉडल आहे आणि तिचे नाव मारिसोल योटा आहे. तिचे 2021 मध्ये जर्मन अब्जाधीश बिझनेसमन बॅस्टियन योटासोबत लग्न झाले. मॉडेल मेरिसोल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय आहे आणि तिचे जवळपास 5 लाख फॉलोअर्स आहेत, ही संख्या हळूहळू वाढत चालली आहे.


मेरीसोलने सांगितले की, सोशल मीडियावर ती तिच्या पतीशी स्पर्धा करत आहे. दोघांनी ठरवले आहे की, पहिल्या महिन्यात कोणाचे जास्त चाहते आहेत आणि सोशल मीडियावरून कोण जास्त कमावते ते पाहूया.


यानंतर मॉडेलने तिच्याकडून अडीच लाख रुपये घेऊन आणि त्याच्यासोबत डेटवर गेली. या प्रसंगामुळे ती चर्चेत येईल, म्हणून तिने हे पाऊल उचललं.



अब्जाधीश उद्योगपती बास्टियन योटा कोण आहे?


बास्टियन योट्टा अतिशय विलासी जीवन जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. बास्टियन योट्टाची कंपनी वजन कमी करण्यासाठी माइंडस्लिमिंग मशीनसह अनेक प्रकारची मशीन बनवते. त्याचे इंस्टाग्रामवर योट्टा लाइफ नावाचे अकाउंट आहे. जिथे तो उत्कृष्ट फोटो पोस्ट करतो.


जर्मनीतील वास्तव्यादरम्यान, बास्टियनला त्याच्या ग्लॅमरस जीवनामुळे अडचणी येऊ लागल्या, त्यानंतर तो अमेरिकेत शिफ्ट झाला. तो म्हणाला  की जर्मनीतील लोक त्याचा हेवा करतात आणि त्याच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते, ज्यामुळे त्याला अमेरिकेला शिफ्ट व्हावं लागलं.