ब्रासिला : आपण अशा अनेक घटना बऱ्याचदा पाहिल्या आहेत, ज्यात आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होते. एक अशीच काहीशी घटना समोर आली आहे. एका माणसाच्या खिशात मोबाईल ठेवण्याच्या सवईमुळे त्याचा जिव वाचला आहे. आता तुम्ही म्हणाल की, हा तर सिनेमातील सिन असावा परंतु असे नाही, ही खरी गोष्ट आहे. या घटनेशी संबंधित मोबाईलचे फोटोही समोर आले आहेत, ज्यात मोबाईलच्या स्क्रीनने त्या व्यक्तीचा जीव कसा वाचवला हे दाखवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरेतर ही घटना ब्राझीलच्या पेट्रोलिना शहरातील आहे. डेली मेलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, दरोडेखोरांनी एका व्यक्तीला गोळ्या घातल्या आणि पोलीस येण्यापूर्वीच ते घटनास्थळावरून पळून गेले.


पोलिसांना घटनास्थळी एक व्यक्ती जखमी अवस्थेत सापडला आणि त्याला तसेच रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांना आढळले की, पीडिताला किरकोळ जखम झाली आहे. परंतु गोळी त्या व्यक्तीच्या शरीरात गेली नाही. हे जाणून पोलिसांना देखील आश्चर्य वाटले.


अहवालानुसार, त्या व्यक्तीवर हल्ला झाल्यानंतर प्रत्येकाला वाटले की, त्याला गोळ्या घातल्या गेल्या, पण तसे झाले नाही. त्या माणसाच्या मोबाईल फोनने ढाल म्हणून काम केले आणि बंदुकीतून निघालेली बुलेट थांबवली. असे सांगण्यात आले की, जेव्हा गोळी झाडली गेली, ती थेट मोबाईलच्या स्क्रीनला लागली आणि तिथून गोळी तिरपे उडाली. या कारणामुळे गोळी त्या व्यक्तीला लागली नाही.


ज्या हॉस्पिटलमध्ये त्या व्यक्तीला दाखल करण्यात आले होते, त्या डॉक्टरांनी त्याच्या मोबाईलचे फोटो आणि घटनेची माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, गोळी लागल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्मालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने गोळी त्याच्या फोनमध्ये आडवी अडकली. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, यामुळेच या व्यक्तीचा जीव वाचला आहे.


सध्या त्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या माणसाची कथा सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांना धक्का बसला. लोकांनी सांगितले की, ही कथा पूर्णपणे फिल्मी दिसते. तर काही युजर्सने मोबाईल बनवणाऱ्या कंपनीचे कौतुकही केले आहे.