Shocking News: कमर्शिअल फ्लाइटमध्ये लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रकार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणावरुन विमानात लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्याऐवजी सदर प्रकार कॅमेरात कैद झाल्यानंतर वैमानिकाविरोधातच विमान कंपनीने चौकशीचे आदेश दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेलं फुटेज हे कॉकपीटमधील सुरक्षा कॅमेरांमधील आहे. स्वित्झ एअरलाइन्सच्या पॅसेंजर जेटमध्ये हा सारा प्रकार घडला आहे. विमानाच्या गॅलरीमध्ये असलेलं जोडपं लैंगिक संबंध ठेवत होतं. हा सारा प्रकार स्वित्झ एअर्सच्या 12 तासांचा उड्डाण वेळ असलेल्या फ्लाइट 181 मध्ये घडला. हे विमान बँकॉकवरुन झुरिचच्या दिशेने प्रवास करत होतं. या फुटेजमधील काही फोटो एका व्यक्तीने एक्स (आधीचं ट्वीटर) या सोशल मीडियावर पोस्ट केलं. "स्वित्झ एअरच्या बँकॉक ते झुरिच प्रवासादरम्यान फर्स्ट क्लास गॅलरीमध्ये संबंध ठेवत असताना वैमानिकांनी गुपपूचपणे त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला," असं या व्यक्तीने म्हटलं आहे. "या प्रकरणामध्ये कॉकपीटमधील कर्मचाऱ्यांविरोधात चौकशी सुरु करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी हे फुटेज ग्रुप चॅटवर शेअर केल्यानंतर ते व्हायरल झाले आहेत," असंही या व्यक्तीने म्हटलं आहे.


सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल


सदर प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वित्झ एअरने चौकशी सुरु केली आहे. घडलेला प्रकार हा प्रवाशांच्या खासगीपणावर गदा आणणारा आहे असा तर्क कंपनीने लावला असून हा सारा प्रकार कॅमेरात कैद करण्यामागे कोणते कर्मचारी आहेत याचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या जोडप्याच्या परवानगीशिवाय त्यांचे खासगी क्षण रेकॉर्ड करण्यात आले असून ते सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्याचं या एअरलाइन्सने म्हटलं आहे. 


थेट समज द्यायला हवी होती


"ज्यांचे व्हिडीओ शूट करत आहे त्यांची परवानगी न घेता ते शूट करणे, तसेच हे असले व्हिडीओ शेअर करणे आमच्या नियम आणि तत्वांच्याविरोधात आहे. डेटा प्रोटेक्शनसंदर्भातील नियमांचं हे उल्लंघन आहे," असं स्वित्झ एअरचे सोशल मीडिया प्रवक्त्या माईकी फुर्लोट यांनी 'डेली मेल'शी संवाद साधताना म्हटलं आहे. जोडप्याला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी थेट जाऊन त्यांना समज घ्यायला हवी होती. त्याऐवजी त्यांनी व्हिडीओ शूट करणे नियमांच्याविरोधात असल्याचं प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. 


उपहासात्मक टिप्पण्या


कॉकपीट डोअरच्या वर असलेल्या लाइव्ह रेकॉर्ड करणाऱ्या सिक्युरिटी कॅमेरामध्ये या जोडप्याचे लैंगिक संबंध ठेवतानाचे खासगी क्षण कैद झाले. 9/11 च्या हल्ल्यानंतर विमानांचे अपहरण रोखण्याच्या दृष्टीने असे कॅमेरा विमानात लावले जातात. या कॅमेरांमधून पायलेट्सला कॉकपीटमध्ये काय सुरु आहे आणि कंट्रोल रुमबरोबर संवाद साधण्याची गरज आहे का? हे समजतं. मात्र या प्रकरणातील लैंगिक संबंध ठेवतानाचे क्षण एका वेगळ्या डिव्हाइजने रेकॉर्ड करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. कारण या व्हिडीओमध्ये समोर जे काही चाललं आहे त्याबद्दल उपहासात्मक टिप्पण्या केल्याचं ऐकू येत आहे. 


हे अपमानास्पद आहे


स्वित्झ एअरने या व्हायरल व्हिडीओचा आणि तो सोशल मिडीयावर शेअर केल्याच्या कृत्याचा निषेध केला आहे. हा सारा प्रकार अपमानास्पद आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.