चोरुन पत्नीचे फोन कॉल ऐकून कमवले 23 कोटी रुपये! Work From Home दरम्यान..; सारेच चक्रावले
Earn 23 Crore Rupees By Secretly Listening Wife Phone Calls: पत्नीचे फोन कॉल्स ऐकून त्याने तब्बल 23 कोटींची कमाई केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आहे. मात्र हा सारा प्रकार या व्यक्तीच्या चांगलाच अंगलट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Secretly Listening Wife Phone Calls: आपल्या जोडीदारावर चारित्र्याचा संक्षय असल्याने केल्या जाणाऱ्या हेरगिरीचे अनेक किस्से तुम्ही यापूर्वी बातम्यांमध्ये, चित्रपटांमध्ये वाचले किंवा पाहिले असतील. अमेरिकेमध्ये असेच एक एक हेरगिरीचे चमत्कारिक प्रकरण समोर आले आहे. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर अजिबात संक्षय नव्हता. मात्र त्याच्या डोक्यात एक कट शिजत होता. या कटातून त्याने तब्बल 2 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल 23 कोटींची कमाई केली. सध्या टेक्सासमधील या व्यक्तीच्या हेरगिरीचा हा अनोखा घटनाक्रम जगभरामध्ये चर्चेत आहे.
पत्नीच्या वर्क फ्रॉम होमचा घेतला गैरफायदा
समोर आलेल्या या प्रकरणाचा तपास यूएस सिक्योरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमीशन म्हणजेच एसईसीने केला असून त्यातून एक धक्कादायक खुलासा झाला आहे. 23 कोटींची कमाई करणारा टायललर लाउडन नावाच्या या आरोपीची पत्नी कोरोना कालावधीमध्ये घरुन काम करत होती. बायकोचं वर्क फ्रॉम होम सुरु असताना पतीही घरुनच काम करायचा. मात्र हळूहळू त्याने पत्नी ऑफिसमधील तिच्या बॉसबरोबर आणि कर्मचाऱ्यांबरोबर काय बोलते हे लपूनछपून ऐकण्यास सुरुवात केली. याची पत्नीला कल्पनाही नव्हती.
नेमकं घडलं काय?
टायलर लाउडनची पत्नी एका मोठ्या कंपनीमध्ये बीपी मर्जर या पदावर कार्यरत होती. कंपनीने ट्रॅव्हल सेंटर्स ऑफ अमेरिका इंटरनॅशनल या कंपनीमधील शेअर्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली. कंपनीने अंतर्गत चर्चेमध्ये अशी माहिती दिली की 74 टक्के प्रीमिअमवर अमेरिकेतील ट्रॅव्हलसेंटरला विकत घेण्यात येणार आहे. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या या महिलेलाही व्हिडीओ कॉलवरील मिटींगमध्ये हे सांगण्यात आलं. मात्र या कॉलवरील संभाषण आपला पती लपून ऐकतोय याची कल्पना तिला नव्हती. टायलर लाउडनने फेब्रवारी 2023 मध्ये आपलं ब्रोकरेज आणि सेवानिवृत्तीच्या खात्यांमधून पैसा एकत्र केला. त्याने ट्रॅव्हलसेंटर कंपनीमध्ये हे पैसे गुंतवून बेकायदेशीररित्या मिळालेल्या माहितीच्या आधारे 1.76 मिलियन डॉलर्सची कमाई केली. कट रचून टायरलने कमवलेल्या या नफ्यासंदर्भात बोलताना नियामक संस्थेनं टायरलच्या पत्नीला याची काहीच कल्पना नव्हती असं म्हटलं आहे. बीपी विलिनिकरण आणि अधिग्रहण प्रबंधक पदावर कार्यरत असलेल्या टायरलच्या पत्नीला पती काय योजना आखतोय याची जराशीही भनक नव्हती, असं एसईसीने म्हटलं आहे.
भांडाफोड झाल्यानंतर पत्नीची नोकरी गेली अन् घटस्फोटाचा अर्जही दाखल
टेक्सासमधील कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुसार, टायलरला आपल्या पत्नीच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य व्यवहाराबद्दल समजल्यानंतर संपूर्ण ट्रॅव्हलसेंटर कंपनीच विकत घेण्याचा त्याने विचार केला. अखेर एक दिवस टायरलचा भांडाफोड झाला आणि त्याने आपला गुन्हा पत्नीसमोर कबुल केला. त्यानंतर पत्नी घर सोडून निघून गेली आणि तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला. एसईसीने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने घडलेल्या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना दिली. यामध्ये सदर महिलेचा कोणताही सहभाग असल्याचे पुरावे आढळून आले नसतानाही तिला कामावरुन निलंबित करण्यात आलं. महिला कर्मचाऱ्याने मुद्दाम ही माहिती पतीला पुरवल्याचा संक्षय कंपनीला असल्याने तिला कामावरुन काढून टाकण्यात आलं. हा घडलेला प्रकार ऐकून सारेच चक्रावून गेले असून आरोपीने त्याची अक्कल हुशारी योग्य जागी वापरली असती तर त्याला योग्य मार्गाने नफा मिळवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असत्या असं काहींनी म्हटलं आहे.