मुंबई : लग्न ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या लग्नात काही खास असावे असे वाटत असते. लग्नात काही नातेवाईकांचे रुसवे फिगवे देखील पाहावे लागतात. मानपानावरुन हे वाद वढतात. परंतु ब्रिटनमधील एका लग्नात मात्र काही वेगळे पाहायला मिळाले. यामध्ये मुलीकडच्यांची वेगळी इच्छा होती, तर मुलाकडच्यांची वेगळी इच्छा होती, ज्यामुळे हे वाद थेट लग्न मोडण्यापर्यंत पोहोचले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नात नवरदेवाच्या बाहिणीने अशी काही मागणी केली की, तिची मागणी ऐकून हे लग्नच अखेर मोडलं. नवऱ्याच्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न मुलीकडच्यांनी केला खरा परंतु ते ती इच्छा पूर्ण करु शकले नाही, ज्यामुळे मुलाच्या बहिणीने लग्नात हंगामा करुन हे लग्न मोडलं. आता तुम्ही विचार कराल की, तिने अशी काय मागणी केली असावी की, ज्यामुळे लग्नाच्या वेळी लग्न मोडू शकतो?


'मिरर' च्या रिपोर्टनुसार, वधूने स्वतः सोशल मीडिया अॅप Reddit वर ही घटना उघड केली आहे. वधूने सांगितले की, वराच्या बहिणीला शाकाहारी जेवण आवडते आणि लग्नाच्या वेळी सर्व पदार्थ शाकाहारीच असले पाहिजेत असे स्पष्ट केले होते. जर असे झाले नाही तर परिणाम चांगले होणार नाहीत, अशी धमकीही तिने मुलीकडच्यांना दिली होती.


वराच्या बहिणीच्या या मागणीमुळे सर्वांना नक्कीच धक्का बसला होता, परंतु संबंध तोडण्यापर्यंत हे प्रकरण जाईल असे कोणाला ही वाटले नाही.


लग्नात वराच्या बहिणीच्या आवडीनुसार, पूर्णपणे शाकाहारी अन्न तयार केले गेले नाही. मुलीचा युक्तिवाद असा होता की, त्यांच्याकडे बाहेरून बरेच पाहुणे आले आहेत, त्यामुळे हे शक्य होणार नाही.


परंतु वराच्या बहिणीला जेव्हा कळले की, लग्नात मांसाहारी जेवण देखील तयार केले आहे, तेव्हा तिला राग आला. तिने वधूच्या कुटुंबातील सदस्यांशी असलेले सर्व संबंध तोडून टाकल्याची घोषणा केली. वराच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही राग आला ज्यामुळे त्यांनी लगेच हे लग्न मोडलं.


ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल होताच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली, काही युजर्सने वराच्या बहिणीवर टीका केली आणि म्हटले की तिने अशी मागणी करायला नको हवी होती, त्यापेक्षा यातुन मार्ग काढायला हवा होता. तर काही लोकांनी नवरदेवाच्या बहिणीला सपोर्ट करत लिहिले की, नवरदेवाकडची माणसं शाकाहारी होती तर मुलीकडच्यांनी अशी मोठी चुक नको करायला हवी होती. त्याचबरोबर ते म्हणाले ही एक छोटीशी मागणी होती जी पूर्ण होऊ शकली असती.


अशाप्रकारे सोशल मीडियावरती लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया लोकांनी दिल्या.