लंडन : सध्या तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या ऐकल्या असतील, त्यात अभिनेत सिद्धार्थ शुक्ला आणि साऊथ सुपर स्टार पुनीत राजकुमारचा ही हृदयविकाराच्या झटक्याने प्राण गेल्याचे देखील तुम्ही ऐकले असेल. अशा स्थितीत शरीरातील लहान-सहान बदलांकडेही दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्ही कोणतेही औषध घेत असाल ज्याचे दुष्परिणाम होत असतील तर तुम्ही त्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. तसेच शरीरातील कोणत्याही दुखण्याला दुर्लक्ष करु नका. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोष्टींचा येथे उल्लेख केला आहे, कारण एका महिलेने तिच्या वन नाईट स्टँड सेक्शुअल अ‍ॅक्टिव्हिटीनंतर अचानक झालेल्या हृदयविकाराची माहिती Reddit या ऑनलाइन वेबसाइटवर शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर


या चुकीमुळे जीवही जाऊ शकतो


ब्रिटीश न्यूज वेबसाईट द सनने दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेला सेक्सुअल एक्टिविटीनंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. अहवालानुसार, हे घडले कारण ही महिला हृदयाशी संबंधित आजारासाठी औषध घेत होती आणि त्यामुळे तिला आहाराची काळजी घेण्यास आणि कठोर परिश्रम, व्यायाम आणि उत्साह यांचा समावेश असलेल्या क्रियाकलापांपासून दूर राहण्यास सांगितले होते.


अनेक तज्ञ सेक्स हा मानवी शरीरासाठी एक महत्वाचा व्यायाम असल्याचे वर्णन करतात, परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे किंवा हेल्थ गाईडलाईन फॉलो न केल्याने व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. 


महिलेने सांगितले, 'काही दिवसांपूर्वी मी एका मित्राच्या लग्नाला गेले होते. या दरम्यान मला एक व्यक्ती भेटला. सोशल मीडियावर आम्ही जवळपास वर्षभरापासून एकमेकांना ओळखत होतो. लग्नात आम्ही जोरदार नाचलो आणि खूप बोललो. पार्टी संपल्यानंतर मी त्याच्यासोबत हॉटेलच्या खोलीत गेलो आणि आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो. आमच्यातील सेक्सुअल एक्टिविटी खूप चांगली होती.


महिलेने तिच्या मुलाखतीत सांगितले की, त्यावेळी तिला छातीत दुखत होते. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिला चक्कर येऊन श्वास घ्यायला त्रास होत असल्याचेही तिने सांगितलं. मग तिला आठवले की, मी एक औषध घेत आहे. ज्यामुळे हृदयाच्या समस्यांचा धोका वाढू शकतो.


रात्री डॉक्टर नव्हते


ती महिला पुढे म्हणाली, 'चांगली गोष्ट म्हणजे त्यावेळी माझ्यासोबत हॉटेलच्या खोलीत एक समंजस व्यक्ती उपस्थित होती. तो लगेच माझ्या कंबरेला घासू लागला. त्याने मला शांत आणि निवांत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. अचानक वेदना कमी झाल्या आणि मला आराम वाटला. सकाळी मी कार्डिओलॉजिस्टला भेटलो आणि त्यांना टेस्ट करून घेण्याबरोबरच मी डॉक्टरला संपूर्ण घटना सांगितली.


सध्या महिलेची प्रकृती ठीक आहे. सोशल मीडियावर महिलेचा हा खुलासा झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिच्यासोबत घडलेल्या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.