महिलांच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या टिकलीमुळेच तिचा जीव धोक्यात
महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आणि तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे.
मुंबई : टिकली ही महिलांचा एक महत्वाचा दागिना आहे. जो त्यांच्या सौंदर्यात भर घालतो. अनेक महिलांना टिकली लावायला आवडतं, तर लग्न झालेल्या हिंदू महिलांना परंपरेप्रमाणे टिकली लावावी लागते. तर काही महिला आपल्या मर्जी नुसार टिकली लावत नाहीत. परंतु महिलेचा हाच सौंदर्याचा दागिना तिच्या जिवावर उठेल याचा कोणी विचार देखील नसावा. कारण एका महिला प्रोफेसरला तिच्या टिकलीमुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागलं.
बांगलादेशातील एका खासगी कॉलेजच्या प्रोफेसरला एका पोलिस अधिकाऱ्याने टिकली लावल्यामुळे जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे. महिलेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आणि तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे.
द टेलिग्राफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीडित महिलेचं नाव लोटा सुमद्देर आहे. ती बांगलादेशमधील तेजगाव कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. शनिवारी सकाळी ती कॉलेजजवळ पोहोचली होती, तेव्हा वाटेत एका पोलिस अधिकाऱ्याने तिला त्रास दिला, ज्यामुळे तिला स्वतःला असुरक्षित वाटू लागले.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत लोटा यांनी सांगितले की, बाईकवरील पोलिस अधिकाऱ्याने माझ्या टिकलीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं, तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने अश्लील शब्द देखील वापरले. महिला प्राध्यापिकेने सांगितले की, जेव्हा तिने पोलिस अधिकाऱ्याच्या या कृतीचा निषेध केला, तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
लोटा सुमद्दर यांनी सांगितले की, आरोपी पोलिस अधिकाऱ्याने तिला दुचाकीने धडक देण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु ती तेथून बाजूला झाली. ज्यामुळे ती आता सुरक्षित आहे.
दुसरीकडे, राजधानीतील शेर-ए-बांगला नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी उत्पल बरुआ म्हणाले, "प्रोफेसरला आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव आठवत नाही. मात्र तिने पोलिसांना दुचाकीचा नंबर दिला आहे. त्याआधारे आम्ही तपास सुरू केला आहे."