ह्यूस्टन : बलुचिस्ताननंतर आता पाकिस्तानचा सिंधी समाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वातंत्र्याची मागणी करणार आहे. बांगलादेशप्रमाणे सिंध देखील पाकिस्तानपासून स्वतंत्र करावा अशी मागणी अमेरिकेतील ह्यूस्टनमध्ये सिंधी कार्यकर्ता जफरने भारताकडे करत आहेत. पाकिस्तानातील सिंधी लोक एक संदेश घेून ह्यूस्टन येथे आले आहेत. जेव्हा पंतप्रधान मोदी सकाळी इथून जातील तेव्हा आम्ही आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवू असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आमची मदत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत हिंसा केली जात आहे. आमचे खूप अधिकारी मारले गेले आहेत. ज्याप्रकारे 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने सहकार्य केले. त्याप्रमाणे सिंधला स्वातंत्र्य मिळविण्यासाठीही करावी अशी इथे आलेल्या सिंध जनतेची मागणी आहे. 



पाकिस्तानी सरकार हे फासिस्ट आणि दहशतवाद्यांचे सरकार आहे. तिथे माणसांचे मृतदेह विकले जातात. अल्पसंख्यांकांना कोणतेच अधिकार नाहीत. त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांनी मदत करावी असे आम्हाला वाटते असे ते म्हणाले. पाकिस्तानी आर्मी आणि आयएसआयला दहशतवादी म्हणून घोषित करावे असेही यात म्हटले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अमेरिकन राष्ट्रपती डोनल्ड देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. ह्यूस्टनच्या एनआरजी स्टेडीअममध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत भारतीय समुदायातील साधारण पन्नास हजार जण सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाबद्दल जनतेमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठे होर्डींग्ज्स लागले आहेत.


हाऊडी मोदी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 1100 हून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस एक करुन काम करत आहेत. अमेरिकेतील 48 राज्यांतील भारतीय समुदाय पंतप्रधान मोदींना ऐकण्यासाठी ह्यूस्टन येथे पोहोचत आहे. हाऊडी मोदी कार्यक्रमात 60 हून अधिक अमेरिकन सासंद सहभागी होण्याची शक्यता आहे. सुरुवातीचा सांस्कृतिक कार्यक्रम साधारण 90 मिनिटांचा असेल. या सांस्कृतिक कार्यक्रमात भारत-अमेरिकी समुदायाची विविधता दिसून येईल. 


टेक्सास आणि पूर्ण अमेरिकेतील 400 कलाकार 17 ग्रुप्समधून यामध्ये सहभागी होतील. स्टेडीयममध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात कलाकार नॉनस्टॉप कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा बजेट वाढवून 2.4 मिलियन डॉलर करण्यात आला.