ब्रिक्स सम्मेलनात पाकिस्तानला झटका
चीनमध्ये सुरू असलेल्या `ब्रिक्स` देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या `शियामीन डिक्लेरेशन`मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.
बिजिंग: चीनमध्ये सुरू असलेल्या 'ब्रिक्स' देशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला थारा देणाऱ्या पाकिस्तानला झटका बसला आहे. ब्रिक्स देशांनी जाहीर केलेल्या 'शियामीन डिक्लेरेशन'मध्ये दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचा धिक्कार करण्यात आला आहे. भारताने चीनमध्ये हा विषय लावून धरला होता.
ब्रिक्स परिषदेत झालेल्या या चर्चेबाबत भारताचे परराष्ट्र सचिव प्रीती शरण यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स देशांच्या सर्व सदस्य राष्ट्रांनी दहशतवादी कारवायांचा निषेध केला. तालीबान, अल कायदा, आयसीस, जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तैयबा, हिजबुल मुजाहुद्दीन या दहशतवादी संघटनांच्या कारवायांवर चिंता व्यक्त करत उत्तर कोरियाच्या मिसाईल परीक्षणावर देखील टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांतता आणि सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक देशांमध्ये परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे. चीनने पाकिस्तानातील दहशतवादाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला पण पंतप्रधान मोदींनी ती गोष्टी तेवढ्याच प्रखरपणे लावून धरली.