Viral news | हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. पण सतत हसत राहिलो तर मात्र लोक आपल्याला वेड्यात काढतील असं वाटेल. पण आता न हसणं नोकरीवर गदा आणण्यासारखं होणार आहे. तसा फतवाच काढण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हसा नाहीतर दंड भरा असे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका देशात हा नियम करण्यात आला आहे. तिथल्या महापौरांनी स्थानिक पातळीवर हा नियम केला आहे. त्यांनी एक पॉलिसी तयार केली आहे. ज्याचं नाव स्माइल पॉलिसी आहे. या अंतर्गत कर्मचाऱ्यांना हसावं लागणार आहे.  


जे कर्मचारी या आदेशाचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या पॉलिसीमुळे लोक चांगले वागतील, हसून खेळून राहातील अशी अशा आहे. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण राहील असा विश्वास आहे. सध्या हा विषय जगभरात चर्चेचा ठरला आहे. 


लोकांनी सरकारी कर्मचारी चांगले सेवा देत नसल्याची तक्रार केली होती. त्यानंतर हा नियम करण्यात आला. ज्यामुळे सरकारी कर्मचारी सेवा देताना हसून बोलतील आणि शांततापूर्ण वातावरण राहील असं महापौरांना वाटत आहे. हा नियम Phillipines इथे करण्यात आला आहे. ज्याची चर्चा जगभरात रंगली आहे. 


स्माईल पॉलिसीअंतर्गत कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, जर त्यांनी या आदेशाचे पालन केलं नाही तर त्यांचा 6 महिन्यांचा पगार कापण्यात येणार आहे किंवा त्यांना कामावरून निलंबितही केलं जाऊ शकतं.