न्यूयॉर्क : अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्य ग्रहण पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये सूर्याच्या अगोदर चंद्र जाणार असून हे तब्बल ९९ वर्षानंतर २१ ऑगस्ट रोजी म्हणजे आज दिसणार आहे. लोकांमध्ये हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रचंड उत्साह असला तरीही त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही हे सूर्यग्रहण कोणतीही काळजी न घेता पाहिलं तर त्याच्या तुमच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. NASA ने सांगितलं आहे की, सूर्यग्रहण कायम अल्ट्रावायलेट किरण रोखणाऱ्या खास चष्म्यातून पाहणं सोईचं असतं. कोणतीही काळजी न घेता सामान्य डोळ्यांनी जर हे सूर्यग्रहण पाहिलं तर तुम्हाला याचा त्रास होऊ शकतो. नासाच्या माहितीनुसार, हे ग्रहण २ मिनिटं ४० सेकंद दिसणार आहे. 



२१ ऑगस्ट रोजी दिसणाऱ्या या सूर्यग्रहणाला इतक्या मोठ्या प्रमाणात कुणीही कव्हर केलेलं नाही. नासा प्रथमच ग्रहणाच्या अगोदर आणि ग्रहणाच्यानंतर याचे फोटो आणि व्हिडिओ लाईव्ह प्रसारित करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील सूर्यग्रहण पाहायचे असेल तर तुम्ही नासाच्या फेसबुक पेजवर किंवा यूट्यूबवर हे सूर्यग्रहण लाईव्ह पाहू शकता. त्याचप्रमाणे संशोधक या सूर्यग्रहणाची माहिती देखील देतील. 


नासा जगभरातून १२ ठिकाणांहून सूर्य ग्रहण लाईव्ह करणार आहे. ही माहिती दाखवण्यासाठी अवकाशात जवळपास ५० फुगे सोडले जाणार आहेत. आणि या फुग्यांच्या मार्फत जवळपास ८० हजार फूट उंचीवरून व्हिडिओ पाठवले जाणार आहे.