नवी दिल्ली : चीन हा देश सातत्याने नवनव्या अविष्कारांसाठी ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपूर्वी काचेचा पूल बनवण्यासाठी चीन चर्चेत होता. आता चीनने असा एक हायवे बनवला आहे की ज्यावर गाड्या चालल्याने वीज उत्पन्न होते. या उत्पन्न झालेल्या विजेचा उपयोग इंडस्ट्रीजच्या विविध कामांसाठी करण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या हायवेमुळे थंडीत जमा होणारा बर्फ वितळवण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सोलार हायवे बनवणार चीन हा पहिला देश आहे. हा हायवे 1 किलोमीटर लांबीचा आहे. ईस्टर्न चायनातील शेनडॉन्ग प्रॉविंसच्या राजधानी जिनान येथे हा हायवे बनवण्यात आला आहे. हायवेच्या बाजूला सोलार पॅनल्स लावण्यात आले आहेत. टेस्टिंगसाठी हा हायवे खूला करण्यात आला आहे.



असा असेल हा हायवे


चीनी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, हा सोलार हायवे तीन स्तरात तयार करण्यात आला आहे. यात ट्रॅसलूसंट कॉन्क्रीट, सिलिकॉन पॅनल आणि इंसुलेशन असे स्तर आहेत. तसंच या हायवेमुळे एका वर्षात 10  मिलियन म्हणजेच 1 कोटी किलोवॉट वीज उत्पन्न केली जाईल, असा दावा करण्यात आला आहे. यातून उत्पन्न होणारी वीज सोलर स्ट्रीट लाइट्ससाठी देखील वापरण्यात येईल. इतकंच नाही तर थंडीत जमा होणारा बर्फ वितळवण्यासाठी स्नो मेल्टिंग सिस्टम वापरण्यात आली आहे. 



सामान्य हायवेपेक्षा अधिक मजबूत


पुढील येणाऱ्या काळात यातून इलेक्ट्रॉनिक वाहाने देखील चार्ज केली जातील. यातून उत्पन्न झालेली वीज चार्जिंग स्टेशनाल सप्लाय करण्यात येईल. एक किलोमीटर लांबीच्या या सोलार हायवेने 63,200 चौरस फूटाचा भाग व्यापला आहे. चीनच्या टोंगजी यूनिवर्सिटीच्या ट्रांसपोर्ट इंजीनियरिंगच्या एक्सपर्ट झेंग होंगचाओ यांनी सांगितले की, हा सोलार हायवे इतर सामान्य हायवेपेक्षा 10 पट अधिक वजन पेलू शकतो. या हायवेच्या 1 चौरस फूटाच्या कामासाठी 458 डॉलर म्हणजेच सुमारे 30 हजार रुपये खर्च आला आहे.


फ्रांन्स आणि हॉलंडमध्येही काम सुरू


चीनने पहिले पाऊल टाकल्यानंतर फ्रांन्स आणि हॉलंड हे देश देखील या दृष्टीने काम करत आहेत. सध्या फ्रान्समध्ये एक गाव आहे जिथे सोलार पॅनल रोड बनवण्यात आले आहेत.