What is Solar Strom : अवकाशात घडणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीवर नासा, इस्रो यांसारख्या देशोदेशीच्या अंतराळ संशोधन संस्था कायमच महत्त्वाची माहिती जगापुढे आणत असतात. अनेकदा अवकाशातून समोर येणारी ही रहस्य अवाक् करणारी असतात. पण, सध्या लक्षात आलेली बाब मात्र चिंता वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था NASA च्या वतीनं नुकताच एक अतिशय गंभीर इशारा दिला होता. या इशाऱ्यानुसार रविवारी रात्री उशिरा पृथ्वीवर एक मोठं सौरवादळ धडकण्याचा इशारा देण्यात आला होता. प्राथमिक स्वरुपात देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार यामुळं संपर्क साधण्याची सर्व माध्यमं ठप्प होणार असल्याचं म्हटलं गेलं. नासानं दिलेला हा इशारा पाहता इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनंसुद्धा सतर्कता बाळगण्यात आली. 


सौरवादळ म्हणजे काय? 


सूर्याकडून वातावरणात सूर्यकिरणं पाठवली जातात. सूर्यप्रकाश आणि याच सूर्यकिरणांमुळं पृथ्वीवर जीवसृष्टीचं अस्तित्वं पाहायला मिळतं. पण, ज्यावेळी अतिशय तप्त अशा या सूर्यामध्ये विक्षोभ (Disturbance) तयार होतो तेव्हा अचानक सूर्यातून बाहेर येणाऱ्या झळांची तीव्रता वाढते. सौरउर्जेच्या याच वादळाला सौरवादळ असं संबोधलं जातं. या वादळाचा परिणाम पृथ्वी आणि तिच्या मॅग्नोटोस्पेअपरसह संपूर्ण सूर्यमालेवर होतो, शिवाय अवकाशातही महत्त्वाचे बदल नोंदवले जातात. 


सौरवादळामुळं अवकाशात मोठ्या प्रमाणात भू चुंबकीय आणि अतीश तीव्र उर्जा असणारे कण बाहेर पडून, त्यामुळं Communication System नष्ट होते. परिणामी रेडिओ ब्लॅकडाऊटसारखी स्थितीसुद्धा उदभवते आणि त्यामुळं सॅटेलाईट, अवकाशयान अनिश्चित काळासाठी ठप्प होतात. 


हेसुद्धा वाचा : PHOTOS : इस्रायलची हळवी बाजू; 'या' रहस्यमयी भिंतीपाशी येऊन का रडू लागतात ज्यू? कारण समोर...


दरम्यान, सध्या इशारा देण्यात आल्यानुसार हे वादळ उपग्रहांवर परिणाम करु शकत होतं. ज्यामुळं मोबाईल, इंटरनेटसारख्या सुविधाही ठप्प झाल्या असत्या. पृथ्वीच्या वातावरणात सौरवादळ आदळल्यानंतर मोठे बदल अपेक्षित असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. अभ्यासक आणि शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार 1859 मध्ये सौरवादळ पृथ्वीवर धडकलं होतं. पण, तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपकरणांचा फारसा वापर नसल्यामुळं फारशी माहिती उपलब्ध नाही. पण, त्या वादळामुळं मानवी जीवनावर मात्र मोठे परिणाम झाले हे खरं.