मुंबई : कंटाळा आलाय... काय ते रोजरोजचं ऑफिसला या, 9 तास बसा, मरमर काम करा आणि थकूनभागून घरी जा, मजा नाहीये राव यात... असं म्हणत तुम्हीआम्ही अनेकदा आपल्या सहकाऱ्यांपुढे रडगाणं लावलं असेल. नोकरीच्या ठिकाणी रोजची कामं, कधीही न संपणारे टार्गेट, ढिगानं बदलणारे नियम आणि त्यातच कायम असंतुष्ट असणारे बॉस, असले की कल्याण झालंच म्हणून समजा. (soups Best Boss took team for a bali trip Viral video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरीच्या ठिकाणी आपण दिवसातले सर्वाधिक ताल घालवतो. त्यामुळं इथलं वातावरण तणावविरहित असावं, अशीच प्रत्येकाची इच्छा असते. पण, तसं होताना दिसत नाही. दिसलं तरीही मग तो अपवाद म्हणावा किंवा क्षणिक अनुभव. 


स्पर्धेच्या या युगात आपणही चिरडलो जात आहोतच. पण यातही परिस्थिती सावरुन नेणारी माणसं आहेत हे मात्र नाकारता येत नाही. अशाच एका व्यक्तीची सोशल मीडियावर प्रचंड वाहवा केली जात आहे. कारण, या Boss नं तिच्या कर्मचाऱ्यांची मेहनत पाहता त्यांना 10 दिवसांसाठी बाली सहलीला नेलं. 


फक्त सहलीला नेलं नाही, तर स्वखर्चानं त्यांना हवं नको तेसुद्धा पाहिलं. सिडनी स्थित मार्केटिंग कंपनी सूप (Soup) एजेन्सीची बॉस, ही सध्या सर्वांसाठीच 'जगात भारी' बॉस ठरतेय. 


असं का? ते कंपनीकडून सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला व्हिडीओ पाहून लगेचच लक्षात येईल. या व्हिडीओमध्ये कर्मचारी बालीमध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासोबतच ऑफिस मिटिंग्सचाही आनंद घेताना दिसत आहेत. काही कर्मचारी क्वाड बाईकिंगचाही आनंद घेतना दिसत आहेत. 


समुद्रकिनारी बिकीनीमध्ये काम, त्यातच भरपूर आराम आणि आयुष्यभराच्या आठवणी हे सर्व काही या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या सहलीमध्ये अनुभवलं. 


कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक Katya Vakulenko यांनी डेली मेलला यासंदर्भातील माहितीही दिली. कोविड 19 च्या काळात आम्ही काम करण्यासाठी नव्या पद्धती अवलंबण्याची गरज आहे. आपण, कोणत्याही ठिकाणहून काम करु शकतो. त्यासाठी आम्ही सहलीवरच जाण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Soup Agency (@soup_agency)


एकिकडे सुट्ट्या देत नाही म्हणून खलनायक झालेला बॉस आणि दुसरीकडे या कंपनीही ही सहल पाहता, अरे इथे जागा असतील तर सांगा आम्हीपण येतो नोकरीला; असाच सूर असंख्य नेटकऱ्यांनी आळवला आहे.