साऊथ कोरियात मोठी दुर्घटना; लॅडिंग करताना विमानाचे दोन तुकडे, 179 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
South Korea Plane Crash : साऊथ कोरियात विमानाचा अपघात, लॅडिंग करताना घडलेल्या दुर्घटनेत 179 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती
South Korea Plane Crash : साऊथ कोरियात 181 लोकांना घेऊन जात असलेला विमान अपघातग्रस्त झाला. या अपघातात 62 लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. विमान लॅडिंगच्या वेळी रनवेवर न राहता तो त्याच्या बाहेर गेला आणि त्यामुळे हा अपघात झाला. रॉयटर्सनुसार, साऊथ कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विमान रनवेवरून घसरून खाली कोसळलं आणि या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला.
रिपोर्ट्सनुसार, जेजू एयरच्या विमानात 175 प्रवासी आणि 6 फ्लाइट अटेंडेंट होते. हे विमान बॅंकॉकवरून परत येत होतं. त्याचवेळी लॅडिंग करत असताना हा भयानकग्रस्त झाला. विमान हे साउथ कोरियाच्या दक्षिण भागात हा अपघात झाला आहे. काही स्थानीक मीडियानं दिलेल्या बातमीनुसार, फोटोंमध्ये विमानातून धूर येत असल्याचे दिसत आहे.
योनहाप न्यूज एजेंसीप्रमाणे, हे विमान बॅंकॉकवरून येत होतं आणि रनवेवरून सटकलं आणि बाहेर येऊन बॉर्डरच्या भिंतीला धडकलं. स्थानिक वेळेनुसार, ही घटना सकाळी 9:07 वाजता दक्षिण-पश्चिम भागात असलेल्या विमानतळावर झाला आहे. साऊथ कोरियाच्या कार्यवाहक राष्ट्रपती चोई सुंग-मोक यांनी मदत आणि बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. बचाव पथकानं काही प्रवाशांना विमानाच्या मागच्या बाजूनं बाहेर काढलं. तर यावेळी 2 लोकं जिवंत असल्याचे समोर आले.
दरम्यान, अशी माहिती समोर येत आहे की लॅडिंग गियरमध्ये असलेल्या समस्येमिळे विमानतळावर हा अपघात झाला. साऊथ कोरियाचे राष्ट्रपती चोई सांग-मू यांनी या विमान अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यासोबत मुआन विमानतळावर लगेच रेस्क्यू ऑपरेशन आणि बचावर कार्य सुरु करण्याचे आदेश दिले होते.