President Salva Kiir :  गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्य महिलांवर लघुशंका करण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सध्या लघुशंकेवरुन जोरदार चर्चा सुरुय. नुकतीच एअर इंडियाच्या (Air India) विमानात एका पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. अशातच दक्षिण सुदानचे (south sudan president) राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर मायार्डित यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरुन सुदानमध्ये पत्रकार आणि सरकार यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू आहे.  राष्ट्राध्यक्षांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दक्षिण सुदानमध्ये सहा पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्हिडिओ समोर आणल्याच्या संशयावरून पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे पत्रकारांच्या संघटनेने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हिडीओमध्ये?


या व्हिडिओमध्ये राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर एका अधिकृत कार्यक्रमात पँटमध्ये लघुशंका करताना करताना दिसत आहेत. नॅशनल असोसिएशन ऑफ जर्नालिस्टने रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. हा वर्षी गेल्या वर्षी डिसेंबरचा असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी उभे असताना 71 वर्षीय राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर यांच्या राखाडी पँटवर काळा डाग पसरलेला दिसत होता. तो डाग हळूहळू पसरत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये राष्ट्राध्यक्षांनी पॅंटमध्ये लघुशंका केल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.



6 पत्रकारांना अटक


हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दक्षिण सुदान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना मंगळवारी आणि बुधवारी ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये कंट्रोल रूम डायरेक्टर जॉबल टॉम्बे, कॅमेरा ऑपरेटर आणि टेक्निशियन व्हिक्टर लाडो, कॅमेरा ऑपरेटर जोसेफ ऑलिव्हर आणि जेकब बेंजामिन, कॅमेरा ऑपरेटर आणि टेक्निशियन मुस्तफा उस्मान आणि कंट्रोल रूम टेक्निशियन चेरबेक रूबेन यांचा समावेश आहे.


स्वातंत्र्यापासून एकच राष्ट्रपती


साल्वा कीर हे 2011 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष आहेत. साल्वा कीर दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून देशात कोणत्याही निवडणुका झाल्या नाहीत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सरकारवर जनतेतून टीका केली जात आहे. कीर हे देश चालवण्यासाठी सक्षम नाहीत असे सुदानच्या लोकांच्या म्हणणे आहे. दुसरीकडे कीर हे आजारी असल्याच्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा सरकारी अधिकाऱ्यांनी वारंवार फेटाळल्या आहेत. त्यामुळे गेल्या दशकापासून देशभरात संघर्ष सुरु आहे.