सर्वात शक्तीशाली रॉकेटसह अंतराळात पाठवली कार
अमेरिकेची स्पेस कंपनी स्पेस एक्सने त्यांचा फॉल्कन हेवी रॉकेट लाँच केला आहे. भारतीय वेळेनुसार या मंगळवारी रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी हे लाँच करण्यात आलं.
नवी दिल्ली : अमेरिकेची स्पेस कंपनी स्पेस एक्सने त्यांचा फॉल्कन हेवी रॉकेट लाँच केला आहे. भारतीय वेळेनुसार या मंगळवारी रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी हे लाँच करण्यात आलं.
स्पेस एक्स कंपनीने म्हटलं आहे की, हा सगळ्यात पावरफूल रॉकेट डेल्टा-4 पेक्षा दुप्पट वजन अंतराळात घेऊऩ जाण्यासाठी सक्षम आहे.
रॉकेटची विशेषता
स्पेस एक्सचं इंजिन 27 मर्लिन 1D च्या गुणवत्तेचं आहे. यांची लांबी 70 मीटर (230 फूट) आणि वजन 63.8 टन आहे. 64 टन भार तो अंतराळात घेऊन जावू शकतो. याची ताकद 18 एयरक्राफ्ट-747 च्या बरोबरीची आहे.
पॉवरफुल रॉकेट
सॅटर्न-5 आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल रॉकेट होता. आता त्याचा वापर बंद झाला आहे. सॅटर्न-5 मध्ये 140 टन भार वाहून नेण्याची क्षमता होती. नासाने सॅटर्न-5 च्या मदतीने चंद्रावर संशोधनासाठी अनेक मिशन पूर्ण केले होते. स्कायलॅब देखील येथून लाँच केली गेली होती. 1973 मध्ये याची चर्चा होती.
रॉकेटमध्ये कार
एलन मस्कने काही दिवसांपूर्वीच स्पेस रॉकेटमध्ये ठेवलेल्या कारचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याचा उल्लेख केला होता की, सामान्यपणे टेस्टिंग रॉकेटमध्ये स्टील ब्लॉक ठेऊन पाठवले जाते. पण काही तरी वेगळं करण्याचा विचार केला. या रॉकेट सोबत पाठवण्यात येणारी कार टेस्ला रोड्स्टर आहे.