स्पेनमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला असून एका रात्रीत ९५० जणांचा बळी गेला. इटलीनंतर आता स्पेनमध्येही १० हजारावर रुग्ण दगावले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १ लाख १० हजारांवर पोहचला आहे. स्पेनमध्ये गेल्या ८-१० दिवसांत इटलीप्रमाणेच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.


स्पेनमध्ये गेले दहा दिवस कोरोनामुळे रोज ५०० हून अधिक लोकांचा बळी जात आहे. त्यात गेल्या रात्री ९५० जणांचा मृत्यू झाला. १ एप्रिलला ९२३ जण मृत्युमुखी पडले, तर ३१ मार्च रोजी ७४८ जण दगावले. ३० मार्चला ९१३ जणांचा बळी गेला,  तर २९ मार्च रोजी ८२१ जण मृत्युमुखी पडले. २८ मार्चला बळी गेलेल्या रुग्णांची संख्या होती ८४४. रोज मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत असताना कोरोना बाधित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनामुळे इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक १३ हजार १५५ जणांचा बळी गेला आहे.