Dead Whale Ambergris: समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या एका मृत व्हेलची किंमत तब्बल 44 कोटींहून अधिक असल्याचा एक दावा केला जात आहे. स्पेनच्या कॅनरी द्विप ला पाल्मा येथील नोगेल्स समुद्र किनाऱ्याच्या तटावर एक व्हेल मृतावस्थेत सापडला होता. मात्र वैज्ञानिकांना या व्हेल माशाच्या पोटात एक अजब दगड सापडला आहे. हा फक्त दगड नसून तो अनमोल खजिना असल्याचा दावा केला आहे. तो प्रकार पाहून सगळेच चक्रावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लास पाल्मास विश्वविद्यालयमध्ये पशू स्वास्थ आणि खाद्य सुरक्षा संस्थेचे प्रमुख अँटोनियो फर्नांडिस रोडिग्ज यांनी मृत व्हेलच्या मृतदेहाचे परिक्षण केले. त्यावेळी त्याचा मृत्यू पाचनसंस्थेमुळं झाल्याचे निदर्शनास आले. माशाच्या पोटात एखादी टणक वस्तू फसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 


44 कोटींचा दगड सापडला


एका अहवालानुसार, लास पाल्मास विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिक रोडिग्स यांनी म्हटलं आहे की, मी मृत माशाच्या पोटातून जवळपास 9.5 किलोचा एक दगड काढला. त्या दगडाला पाहताच त्याचे डोळे विस्फारले. कारण त्यांच्या हातात अनमोल किमतीचा एम्बरग्रीस होता. त्या दगडाची किंमत जवळपास 5.4 मिलियन डॉलर इतकी आहे. ( म्हणजे भारतीय रुपयांनुसार 44 कोटी इतकी आहे.) दरम्यान, संस्थेला एका खरेदीदाराची गरज आहे जो या एम्बरग्रीस खरेदी करु शकेल. एम्बरग्रीसच्या विक्रीतून येणारे पैसे 2021मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं झालेल्या नुकसान भरपाईसाठी वापरण्याचा विचार संस्थेकडून केला जात आहे. 


एम्बरग्रीस म्हणजे काय?


व्हेल माशाच्या उलटीला एम्बरग्रीस असं म्हणतात. फ्रान्समध्ये एम्बर आणि ग्रिस या शब्दांना जोडून हा शब्द तयार करण्यात आला आहे. व्हेल साधारणपणे कोळंबी आणि म्हाकूळ  खातो ज्याचा भाग कडक असल्यामुळं त्याचे पचन होत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते.


एम्बरग्रीसचा फायदा कशासाठी होतो?


एम्बरग्रीसला समुद्रातील खजिना किंवा तरंगते सोने असंही म्हणतात. व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. त्यामुळंच या व्हेल माशाच्या उलटीची किंमत कोटींच्या घरात आहे. मात्र, अनेक देशांमध्ये व्हेल माशाची उलटी विकण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.