Viral Video: श्रीलंकन पंतप्रधानांच्या बेडवर WWE चा आखाडा, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आंदोलक मौजमजा करत आहेत. राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पिकनिक स्पॉट बनला आहे.
Srilanka Economic Crisis: श्रीलंकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरू आहे. देशातील जनता राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे, तर राजपक्षे 13 जुलै रोजी पद सोडणार आहेत. आंदोलक त्यांच्या निवासस्थानी घुसल्याने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे देश सोडून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. जोपर्यंत राजपक्षे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांच्या निवासस्थान सोडणार नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
देशातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आंदोलक मौजमजा करत आहेत. राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधानांचे निवासस्थान पिकनिक स्पॉट बनला आहे. आंदोलकांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत आंदोलक स्वयंपाक करताना, कॅरम बोर्ड खेळताना दिसत आहेत. काही जण सोफ्यावर आराम करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात आंदोलक पंतप्रधानांच्या पलंगावर WWE खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. आंदोलक बेडवर WWE कुस्तीपटूंची नक्कल करताना दिसत आहेत.
राष्ट्रपती राजपक्षे बुधवारी राजीनामा देणार आहेत. तत्पूर्वी ते कुठे आहेत? याबाबत कोणतीही माहिती नाही. शनिवारी संध्याकाळी सर्वपक्षीय बैठकीनंतर राष्ट्रपती राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयाची माहिती सभापतींना दिली. श्रीलंकेत व्यापक सरकारविरोधी निदर्शने झाल्यानंतर राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे यांनी ९ मे रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.