जेरुस्लेम : कोरोना संकटावर मात केल्यानंतर उत्तर इस्त्राईलमध्ये (North Israel) पहिलांदाच धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. या समारंभाच्या दरम्यान, झालेल्या चेंगराचेंगरीत( Israel Stampede)  40 लोकांचा मृत्यू झाला तर शेकडो लोक जखमी झालेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहा हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या यहुदी धार्मिक  कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर इस्राईलमधील सर्वात मोठ्या यहुदी धार्मिक सभारंभाचे आयोजन केले होते. किमान 40 जण ठार आणि शेकडो जखमी झाले. इस्राईलमधील बचाव आणि मदत करणाऱ्या अधिकाऱ्याने घटनेत 40 जणांच्या मृत्युला दुजोरा दिला आहे. या कार्यक्रमास हजारो लोकांनी हजेरी लावली. इस्त्रायली मीडियाने या घटनेत कमीतकमी 40 मृत्यूची नोंद केली आहे आणि घटनास्थळावर मृतदेहाची छायाचित्रे छापली आहेत.


धार्मिक कार्यक्रमास हजारो लोक 


ही घटना माउंटन मेरॉनमधील बोनफायर फेस्टिवलच्या मुख्य कार्यक्रमादरम्यान घडली. या दिवशी हजारो लोक विशेषत: अल्ट्रा-ऑर्थोडॉक्स ज्यू रब्बी शिमोन बार योचाय यांच्या सन्मानार्थ एकत्र जमतात. रब्बी शिमोन बार योचाई हे दुसऱ्या शतकातील संत होते जे येथे दफन केले गेले. गर्दी पारंपरिकपणे माउंटन मेरॉन येथे कार्यक्रमादरम्यान बोनफायर करते.


 ही मोठी दुर्घटना -  बेंजामिन नेतन्याहू 


पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी याला एक मोठी शोकांतिका म्हटले आहे. सर्वांनी पीडितांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले. मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून चेंगराचेंगरीचे कारण देखील लगेच कळू शकले नाही. सोशल मीडियावर कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये ज्यू लोक मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी जमलेल्या दिसत आहेत.


एका दिशेने गर्दी झाल्याने अपघात  


डवीर (24) नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सैन्याच्या रेडिओ स्टेशनला सांगितले की लोकांची गर्दी एकाच दिशेने आल्याने झाली. ते म्हणाले, 'जणू मी मरणार आहे असे वाटत होते. मदत व बचाव सेवा मेगन डेव्हिड अ‍ॅडम यांनी ट्विट केले की ते 103 लोकांवर उपचार करत आहेत, त्यापैकी 38 जणांची प्रकृती गंभीर आहे. इस्त्रायली माध्यमांनी यापूर्वी माउंट मेरेन स्टेडिअममध्ये आसन व्यवस्था कोसळल्यामुळे चेंगराचेंगरी झाली असल्याचे म्हटले होते. हा मोठा दु:खाचा डोंगर कोसळल्याची बातमी दिली. मात्र, चेंगराचेंगरीत सर्व लोक जखमी झाल्याची माहिती बचाव सेवेने दिली आहे. इस्त्रायली मीडियाने एका अज्ञात वैद्यकीय अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, या घटनेत किमान 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, इस्त्राईलमधील बचाव सेवेच्या अधिकाऱ्याने घटनेत 40 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहेे.


लष्करी हेलिकॉप्टरची मदत


इस्त्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी या भागात 'इतक्या मोठ्या घटनेत' मदत करण्यासाठी हेलिकॉप्टरसह औषधे पाठविण्यात आले आहे. अपघातील लोकांचा शोध घेण्यासाठी आणि मदतीसाठी बचाव पथक पाठवले आहे, असे स्पष्ट केले. मात्र, त्यांनी घटनेचे स्वरूप कसे होते, याबाबत माहिती दिली नाही.