NASA Overlooked Starliner Helium Leak : नासाचे महत्वकांक्षी स्टारलाइनर अंतराळयान दोन आंतराळवीरांना घेऊन आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेलं होतं. मात्र, आता हे यान अवकाशातच अडकल्याची माहिती मिळत आहे. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बच विल्मोर यांच्याजवळ आता फक्त 27 दिवसांचा इंधनसाठा शिल्लक असल्याने नासाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळयानातील दोन्ही अंतराळवीर सुरक्षित आहेत, अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे. परंतू, सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? असा सवाल विचारला जातोय. अशातच एका धक्कादायक वृत्तानुसार, अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाला प्रक्षेपणाआधीच हेलियम गळतीची माहिती होती, अशी माहिती समोर आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नासाला हिलियमच्या गळतीविषयी माहिती असताना देखील त्यांनी प्रकरण गांभिर्याने घेतलं नाही आणि मोहिमेला ग्रीन सिग्लन दिला, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, नासाने यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही. अशातच आता नासासमोर कोणते पर्याय शिल्लक आहेत? याची माहिती घेऊया...


नासाला आता आपल्या जुन्या सहकाऱ्याची म्हणजेच स्पेस एक्सची मदत घ्यावी लागेल. स्पेस एक्सचं Dragon-2 कॅप्सूल अवकाशात पाठवल्यानंतर दोन आंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणता येईल. त्यासाठी नासाला लवकर योजना तयार करावी लागणार आहे. तर दुसरीकडे नासाला सुनीता विलियम्स आणि बॅरी यांना परत आणण्यासाठी रशियाची मदत देखील घ्यावी लागणार आहे. रशिया ताबडतोब आपले सोयुझ अंतराळयान अंतराळ स्थानकावर पाठवू शकतो.


सोयुझ कॅप्सूल नेहमी स्पेस स्टेशनवर एस्केप क्राफ्ट म्हणून तैनात असते. त्याच्या मदतीने आंतराळवीर पृथ्वीवर परत येऊ शकतो. जर एवढ्याने मिशन पूर्ण होत असेल तर नासाला चीनची मदत घ्यावी लागेल.  चीनचं शेनझोऊ  अंतराळयान नासाच्या मदतीला धावून येऊ शकतं. तर युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्त्रो देखील मदत करण्यास उत्सुक असेल.


दरम्यान, 5 जून रोजी अवकाशवारीवर गेलेल्या विलियम्स 13 जून रोजी अवकाशातून पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं. पण, त्या अद्याप पृथ्वीवर पोहोचू शकल्या नाहीत. विल्यम्स यांच्या बोईंग स्टारलायनरमध्ये हेलियम लीक झाल्यामुळं त्यांच्या परतीच्या प्रवासात व्यत्यत येत असल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी सध्याच्या घडीला विलियम्स आणि त्यांच्यासमवेत असणाऱ्या अंतराळयात्रींना सुखरुप पृथ्वीवर परत आणण्यासाठीच नासाचे प्रयत्न सुरु आहेत.