Chhatrapati Shivaji Maharaj: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला; पुण्याशी खास कनेक्शन
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in California San Jose: हा उत्तर अमेरिकेमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in California San Jose: अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) राज्यामधील सॅन होजे (San Jose) शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून तो चोरण्यात आला आहे. तर या पुतळ्याचा भाग असलेला अश्वच्या पायांकडील भाग तसाच आहे. एका उद्यानामध्ये हा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा चोरीला गेला आहे.
कोणी दिली माहिती?
‘पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्र्हिसेस’ने शुक्रवारी ‘ट्विटर’द्वारे हा पुतळा चोरीला गेल्याची माहिती माहिती दिली आहे. स्थानिक न्यूज चॅनेल ‘केटीव्हीयू’ने दिलेल्या वृत्तानुसार या पुतळ्याची चोरी नेमकी कधी झाली, याचा तपशील मिळू शकलेला नाही. मात्र आता सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे या पुतळ्याची विटंबना करुन त्याचा काही भाग कोणी चोरला याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणामुळे शहरातील नागरिकांना फार दु:ख झालं आहे, असं या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं आहे. स्थानिक प्रशासनाबरोबरच समाजातील प्रभावी व्यक्तींबरोबर एकत्रित काम करुन या विषयावर काही मार्ग निघतोय का याची चाचपणी केली जात आहे. जशी माहिती समोर येईल तशी पुरवली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
पुणे कनेक्शन
अमेरिका आणि भारतादरम्याच्या 'सिस्टर सिटी’ मोहिम राबवली जाते. याच मोहिमेअंर्गत सॅन होजे आणि पुणे या दोन शहरांमध्ये संस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. याच मोहिमेअंतर्गत पुणे शहराच्यावतीने भेट देण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथील बगीचामध्ये उभारण्यात आला होता. या पुतळ्याच्या विटंबनेसंदर्भातील माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणाचा तपास सॅन होजेमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत. उत्तर अमेरिकेमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा म्हणून ओळखला जातो. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून स्थानिकांचीही यासाठी मदत मागण्यात आली आहे.