डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करणाऱ्या पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सला अटक
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या पॉर्नस्टार स्टेफनी हिला एका पबमधून अटक करण्यात आली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप करणाऱ्या पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफर्ड तथा स्टॉर्मी डॅनियल्स हिला एका पबमधून अटक करण्यात आली आहे. स्टेफनी ही अमेरिकेतील वेगवेगळ्या स्ट्रीप क्लबमध्ये काम करते. या क्लबमध्ये परफॉर्म करताना तिने एकाला नको तिथे हात लावला. त्यामुळे एका प्रेक्षकाने तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी स्टेफनीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा गौप्यस्फोट याआधी स्टॉर्मी डॅनियल्स हिने केला होता. स्टेफनी हिला कोलंबस येथील एका स्ट्रीप क्लबमध्ये आलेल्या एका व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला म्हणून तिला अटक करण्यात आलेय. स्टेफनीचे वकील मायकल एवेन्ट्टी यांनी तिच्या अटकेला दुजोरा दिलाय. राजकीय डाव असून तिला राजकीय सूडातून अटक केल्याचे तिच्या वकिलांनी म्हटलेय. स्टेफनीच्या वकिलांनी तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत.
स्टेफनी ही अमेरिकेतील वेगवेगळ्या स्ट्रीप क्लबमध्ये काम करते. या क्लबमध्ये परफॉर्म करताना एखाद्या प्रेक्षकाला स्टेजवर बोलवून त्याच्यासोबत चाळे करण्यासाठी स्टेफनी प्रसिद्ध आहे. तिच्या चाळ्यांनीच तिला अडचणीत आणले आहे. याप्रकरणी स्टेफनीला अटक करण्यात आली आहे.