Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचे काही व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. रस्त्यावरून गाडी चालवताना असो किंवा रस्त्याने चालताना आजकाल कसाही अपघात घडू शकतो. अशा अपघाताचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. आजकाल रस्त्यावरून चालतानाही अलर्ट राहवं लागतं. कारण नजर हटी दुर्घटना घटी, असा काहीसा प्रसंग या व्हिडीओमधील कपलवर आला. या व्हिडीओतील थरार पाहून आपल्या हृदयाचा डोका काही सेकंदसाठी चुकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थरारक दृष्य 
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कपल रस्त्याच्या कडेने आरामात जात असतं. त्यांच्या स्वप्नातही आलं नसेल की, काही क्षणानंतर त्याचासोबत काय घडेल ते. रस्त्याच्या कडेने आरामात एकमेकांशी बोलत जात असताना, अचानक एक गाडी भरधाव वेगाने त्यांचा दिशेने आली आणि पुढे जे काही झालं ते पाहून आपल्या अंगावर काटा येतो. 


या कपलवर अचानक ओढवलेल्या या संकटामुळे काय करावे हा विचार करायलाही त्यांना वेळ मिळाला नाही. जशी ती भरधाव वेगाने गाडी त्यांचाकडे आली त्यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारली. काळा आला होता पण वेळ नाही. नशीबाने या कपलचा जीव या भीषण अपघातातून थोडक्यात वाचला आहे. झालेल्या घटनेनंतर ही कपल काही वेळेसाठी सुन्न पडले होते. 



या व्हिडीओला सोशल मीडियावर आतापर्यंत 10 लाख लोकांनी पाहिला आहे. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सना या कपलच्या नशीबावर विश्वास बस नाही आहे.