Operation Kaveri: उत्तर आफ्रिकेतल्या सुदानमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत यादवी (Sudan Crisis) सुरु आहे. सुदानमध्ये वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतातर्फे 'ऑपरेशन कावेरी' ( Operation Kaveri) मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतीय वायूसेनेने (Indian Air Force) आतापर्यंत 1200 भारतीयांना मायदेशी आणलं आहे. यादरम्यान भारतीय वायूसेनेने सुदानमध्ये केल्या बचावकार्याचा थरारक व्हिडिओ (Rescue Operation Video) समोर आला आहे. सुदानमध्ये रात्रीच्या अंधारात सी-130 विमान उतरवण्यात आलं आणि एका गर्भवती महिलेसह 121 भारतीयांना रेस्क्यू करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुदानची राजधाणी खार्तुमपासून (Khartoum) जवळपास 40 किलोमीटर दूर सईदना नावाचं शहर आहे. तिथे एक छोटीशी धावपट्टी आहे. पण इथे ना नेव्हिगेशनची सुविधा होती ना लाईट्स होत्या. होता तो फक्त काळाकुट्ट अंधार. पण भारतीय वायूसेनेच्या जवानांनी जिवाची बाजी लावत या धावपट्टीवर विमान उतरवलं आणि अकदी सुरक्षितपणे 121 भारतीय नागरिकांना सुदानमधून बाहेर काढलं. 


यासाठी सेनेच्या जवानाने अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर केला. यात त्याने नाइट व्हिजन चष्म्याचा वापर केला. भारतीय वायुसेनेने ट्विटरवर या बचावकार्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलंय ' 27 आणि 28 एप्रिललाच्या रात्री साहसी ऑपरेशन राबवण्यात आलं. भारतीय वायुसेनेचं C-130J विमानातून सुदानमधल्या सईदनामधून 121 भारतीयांना सुखरुप मायदेश आणण्यात आलं. यात एका गर्भवती महिलेसह काही आजारी नागरिक होते. ही जागा खार्तुमपासून 40 किमी दूर आहे.'


सईदनाच्या ज्या धावपट्टीवर विमान उतरवण्यात आलं. त्या कोणतीही सुविधा नव्हती. कोणतंही विमान धावपट्टीवर उतरवताना तिथं लँडिंग लाईट्स लावण्यात आलेले असतात. पण सईदना धावपट्टीवर केवळ काळाकुट्ट अंधार होता. पण वायुसेनेच्या पायलेट्सने इन्फ्रा-रेड सेंसरचा वापर करत धावपट्टीचा अंदाज घेतला. त्याचबरोबर नाईट व्हिजन चष्म्याचा वापर करत विमान धावपट्टीवर सुरक्षित उतरवलं. भारतीय वायुसेनेने आतापर्यंत 2100 भारतीयांना सुखरुप मायदेश आणलं आहे. 



सुदानमध्ये संघर्ष का पेटलाय?
सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून लष्करी आणि निमलष्करी दलात मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. या संघर्षात हवाई हल्ले, गोळीबार होत असून आतापर्यंत अनेक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. दुर्देवाने यात एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सुदानमध्ये भारतीयच नाहीत इतर देशांचेही लोकही अडकलेत. लष्करी दल आणि निमलष्करी दल यांचं विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून सुदानमध्ये संघर्ष पेटलाय.