काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शुक्रवारी आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १० जण ठार झालेत तर अनेक लोक जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लेखोरानं शियांची मस्जिद असलेल्या इमाम जमानमध्ये जमा झालेल्या गर्दीत आत्मघातकी हल्ला केला. नमाज अदा करण्यासाठी लोक इथं जमा झाले होते.    
आत्तापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.


दहशतवादी हल्ल्यांची साखळी...


उल्लेखनीय म्हणजे, अफगाणिस्तानात शियांना अनेक वेळा टार्गेट बनवलं जातंय. गेल्या आठवड्यात यूएनद्वारे जाहीर केलेल्या एका अहवालात, इथं यंदा झालेल्या धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यात ८४ जण ठार तर १९४ जखमी झाल्याचं म्हटलंय. यातील दोन हल्ले ऑगस्टमध्ये तर सप्टेंबर महिन्यात काबुलमध्ये दोन वेगवेगळ्या मस्जिदवर घडवून आणण्यात आले होते. 


यापूर्वीही, गुरुवारी अफगानिस्तानातील कंदहारमधल्या आर्मी बेसवर आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४३ सैनिक मारले गेले. दहशतवाद्यांनी मयवांडस्थित आर्मी बेसमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला आणि गोळीबारही केला होता.